१८... बेला ... महिला केंद्र

By Admin | Updated: December 18, 2014 22:39 IST2014-12-18T22:39:33+5:302014-12-18T22:39:33+5:30

(फोटो)

18 ... Bella ... Female center | १८... बेला ... महिला केंद्र

१८... बेला ... महिला केंद्र

(फ
ोटो)
बेला पोलीस ठाण्यात महिला साहाय्यता कक्ष
नागपूर : उमरेड तालुक्यातील बेला पोलीस ठाण्यात पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या हस्ते महिला सहाय्यता कक्षाचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले. यापूर्वी कळमेश्वर व केळवद पोलीस ठाण्यात सदर कक्ष सुरू करण्यात आला आहे.
बलात्कार, विनयभंग, घरगुती भांडणे या संदर्भात महिलांना त्यांच्या तक्रारी पोलीस ठाण्यात नोंदविताना पुरुष कर्मचाऱ्यांमुळे काही अडचणी यायच्या. पुरुष कर्मचाऱ्या पीडितेला विचारपूस करताना काही बाबींचे भान ठेवावे लागते. त्यामुळे काही महत्त्वाच्या बाबी तक्रारीत स्पष्ट होत नसल्याने गुन्हे नोंदविण्याच्या प्रक्रियेत व तपासात अडचणी निर्माण व्हायच्या. पोलीस ठाण्याच्या आवारात महिला सहाय्यता कक्षाची स्वतंत्र निर्मिती केल्याने तसेच या कक्षात महिला पेालीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याने या अडचणी दूर होणार असल्याचा आशावाद आरती सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. या कक्षामुळे पीडित महिलेच्या मनात सुरक्षितता, सुलभता व आत्मविश्वास निर्माण होणार असून, जिल्ह्यातील इतर पोलीस ठाण्यात महिला सहाय्यता कक्षाची निर्मिती लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
कार्यक्रमाला उपविभागीय पोलीस अधिकारी शीतल वंजारी, महिला तक्रार निवारण केंद्राच्या प्रमुख तथा सहायक सहायक पोलीस निरीक्षक अनामिका मिर्झापुरे, ठाणेदार अशोक देवतळे, उपनिरीक्षक आडोळे, सिर्सीच्या सरपंच निकिता चुटे, महिला दक्षता समिती सदस्य प्रज्ञा अवचट, पुष्पा पेटकर यांच्यासह शिक्षिका व विद्यार्थिनी उपस्थित होत्या. (प्रतिनिधी)
***

Web Title: 18 ... Bella ... Female center