शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

राममंदिराच्या भूमिपूजनात १७० जण सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2020 06:53 IST

रामजन्मभूमी ट्रस्टचे सर्व विश्वस्त, ५० मठांचे महंत राहणार उपस्थित

त्रियुग नारायण तिवारी।अयोध्या : रामजन्मभूमी मंदिराच्या भूमिपूजन कार्यक्रमात १७० जण सहभागी होणार आहेत, असे समजते. यात रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टचे सर्व विश्वस्त व अयोध्येतील सुमारे ५० मठ, मंदिरांचे महंत गण, रामजन्मभूमी मंदिर आंदोलनांतील काही अग्रणी व अयोध्येशी संबंधित लोकप्रतिनिधीच सहभागी होणार आहेत. ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपालदास, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ व राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत सहभागी होणार आहेत. चातुर्मास सुरू असल्यामुळे ट्रस्टच्या काही सदस्यांनी उपस्थित राहण्यास असमर्थता दर्शवली आहे.

कार्यक्रमाच्या निमंत्रणासाठी अतिथींना ई-मेल पाठवले जात आहेत. ते ई-मेलच त्यांची प्रवेशपत्रे असतील. पंतप्रधानांच्या विशेष सुरक्षेचे पथक अयोध्येत दाखल झाले. त्यांनी स्थानिक जिल्हा प्रशासनाशी समन्वयातून कामही सुरू केले आहे. अयोध्येत येणाऱ्या सर्व मार्गांवर अडथळे लावून तपासणी केली जात आहे.आंदोलनांतील अग्रणी नेत्यांना निमंत्रणसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राममंदिर आंदोलनाचे तत्कालीन अग्रणी राहिलेले माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह, माजी खा. विनय कटियार, माजी मुख्यमंत्री उमा भारती, साध्वी ऋतंभरा, मध्यप्रदेशात राममंदिर आंदोलन उभारणारे जयभानसिंह पवैया यांना कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे.कल्याणसिंह हे ४ आॅगस्ट रोजीच अयोध्येत दाखल होणार आहेत. त्याच्यासाठी स्थानिक हॉटेलमध्ये खोलीही बुक करण्यात आली आहे. माजी मुख्यमंत्री या नात्याने त्यांची व्यवस्था केली जात आहे.अयोध्येचे खा. लल्लू सिंह, आ. वेदप्रकाश गुप्ता, अयोध्येचे महापौर ऋषिकेश उपाध्याय यांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. याबरोबरच अयोध्या धामचे ५५ प्रमुख संत, महंतही आमंत्रित आहेत.सोमवारपासून अयोध्येत कोणालाही प्रवेश नाहीपोलीस सूत्रांचे म्हणणे आहे की, सोमवारपासून अयोध्येत कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. त्या दिवसापासून पंतप्रधानांच्या सुरक्षेचे एसपीजी पथक संपूर्ण परिसराचा ताबा घेणार आहे. परिसरात चालू असलेल्या कामातील मजुरांना २ तारखेच्या सायंकाळपासून प्रवेश दिला जाणार नाही. परिसरात व्यासपीठ उभारण्याचे काम वेगाने सुरू आहे.

टॅग्स :Ayodhyaअयोध्याRam Mandirराम मंदिरNarendra Modiनरेंद्र मोदी