शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

१७... नांद

By admin | Updated: December 18, 2014 00:40 IST

विदर्भ सघन सिंचन योजनेचा निधी मिळणार कधी?

विदर्भ सघन सिंचन योजनेचा निधी मिळणार कधी?
भिवापूर तालुका : निधीअभावी कामे रखडली
नांद/भगवानपूर : विदर्भ सघन सिंचन योजनेत भिवापूर तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. मात्र, संबंधित विभागाकडून निधी उपलब्ध करून देण्यास दिरंगाई होत असल्याने तालुक्यातील सिंचनाची विविध कामे रखडली आहेत. त्यामुळे हा निधी कधी मिळणार आहे, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
विदर्भातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील लघुसिंचनाची कामे मार्गी लावण्यासाठी विदर्भ सघन सिंचन योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत शेततळे तयार करणे, नाल्यावर सिंमेटचे बंधारे तयार करणे, नाल्याचे खोलीकरण करणे, नाल्यावर साधे बांध तयार करणे यासह अन्य महत्त्वाची कामे केली जात असून, त्यासाठी शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. शेतीचे संरक्षित सिंचन व्हावे, भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ व्हावी, पर्यायाने शेतीची उत्पादनक्षमता वाढावी हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे.
भिवापूर तालुक्यातील नांद कृषी मंडळांतर्गत गावांमध्ये ही योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याअनुषंगाने नांद कृषी मंडळांतर्गत येणाऱ्या भगवानपूर, झमकोली, इंदापूर या गावांची ही योजना राबविण्यासाठी निवड करण्यात आली. या गावांच्या शिवारातील अंदाजित कामांचे नियोजन करून अहवाल तयार करण्यात आला आणि हा अहवाल मार्चमध्ये भिवापूर तालुका कृषी कार्यालयामार्फत कृषी विभागाच्या पुणे येथील कार्यालयाकडे पाठविण्यात आला. यात भगवानपूर येथे ३३३.१० लाख रुपये, झमकोली शिवारात ११५५.०७ लाख आणि इंदापूर शिवारात १४०.३१ लाख रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली.
या योजनेंतर्गत या तिन्ही गावांमधील ठिबक व तुषार सिंचन संच, डिझेलपंप, वीजपंप व सूक्ष्म सिंचन साधानांवर ५० टक्के अनुदान जाहीर केले आहे. शिवाय, या तिन्ही शिवारातील तीन हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. ही कामे आजही सुरू करण्यात आली नाही. या संदर्भात तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता, त्यांनी सुरुवातीला विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण सांगितले होते. ही योजना उमरेड उपविभागातील उमरेड व कुही तालुक्यातही राबविली जात आहे. त्या तालुक्यांना निधी प्राप्त झाला आहे. मात्र, भिवापूर तालुक्याला निधी न मिळाल्याने या प्रकरणाची चौकशी करून निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)
***