१७... सारांश जोड

By Admin | Updated: December 18, 2014 00:40 IST2014-12-18T00:40:42+5:302014-12-18T00:40:42+5:30

वाढत्या चोरीला आळा घाला

17 ... add summaries | १७... सारांश जोड

१७... सारांश जोड

ढत्या चोरीला आळा घाला
सावनेर : तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीचे प्रमाण वाढत आहे. शेतातील शेतपयोगी साहित्य व शेतीमाल चोरीला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील चोरीला आळा घालण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
***
विजेचे खांब सरळ करा
उमरेड : तालुक्यातील मकरधोकडा व शिरपूर शिवारातील विजेचे खांब वादळामुळे वाकलेले आहेत. सदर खांब बदलविण्यात यावे, अशी मागणी अनेकदा करण्यात आली. या नादुरुस्त खांबांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने हे खांब सरळ करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
***
पांदण रस्त्यांची दुरुस्ती करा
नरखेड : तालुक्यातील पांदण रस्त्यांची दैनावस्था झाल्याने शेतकऱ्यांना वहिवाट करण्यासाठी तसेच शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या पांदण रस्त्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
***

Web Title: 17 ... add summaries