शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

160 जागा, 3 नेते आणि मोठ्या फेरबदलाची तयारी; 2024 साठी भाजप तयार करतोय 'मास्टर प्लॅन'

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2023 1:11 PM

...अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने आता संघटनेमध्ये काही बदल करण्याची तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत अनेक राज्यांमध्ये पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बदलले जाऊ शकतात. तसेच, स्थानिक पातळ्यांवरही बदल केले जातील. याशिवाय काही नेत्यांना नव्या जबाबदाऱ्याही दिल्या जाऊ शकतात. पक्षांतर्गत चर्चा आहे की, महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळणारे अनेक पदाधिकारी आहेत, मात्र त्यांना निवडणूक लढविण्याचा व लढण्याचा फारसा अनुभव नाही. अशा परिस्थितीत निवडणुकीच्या राजकारणाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्यांना प्राधान्य दिले जाईल.

प्रामुख्याने महाराष्ट्र आणि गुजरातमधील बड्या नेत्यांना  महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळू शकतात. भाजपच्या सूत्रांचे म्हणणे आहे की, पक्ष यूपी आणि महाराष्ट्र सारख्या मोठ्या राज्यांमध्ये 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. लोकसभेच्या 128 जागा या दोन राज्यांतूनच येतात. उत्तर प्रदेशात 80 जागा आहेत, यानंतर महाराष्ट्राने 48 खासदार दिल्लीला पाठवले आहेत. यूपीमध्ये भाजप पक्षाची स्थिती मजबूत मानून चालत आहे. यानंतरही 9 जागांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला आहे, जेथे ते आधी जिंकू शकले नव्हते.

भाजपला उत्तर प्रदेशपेक्षा महाराष्ट्रासंदर्भात अधिक चिंता - भाजप महाराष्ट्राच्या बाबतीत अधिक चिंतित आहे. कारण येथे, शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस एकत्रित आहेत. हे तिन्ही एकत्र आले, तर एक मास बेस तयार होतो. सामाजिक समीकरणही अशा पद्धतीने तयार झाले असून, यामुळे भाजपचा ताण वाढणार आहे. तिन्ही पक्ष एकत्रित आल्याने भाजपचे विदर्भ, मराठवाड्यापासून ते मुंबईपर्यंतचे टेन्शन वाढले आहे. एकनाथ शिंदे गटाकडून भाजपला आशा आहे. मात्र यातही, भाजप स्वतः किती जागांवर निवडणूक लढवते आणि शिवसेनेला (एकनाथ शिंदे गट) कुठे संधी देते, हे पाहावे लागले.

160 जागा आणि तीन नेत्यांना जबाबदारी, भाजपचा मास्टर प्लॅन - सोमवारी आणि मंगळवारी अमित शहा, जेपी नड्डा आणि भाजपचे संघटन सरचिटणीस बीएल संतोष यांची बैठक झाली. या बैठकीत, संघटनेतील फेरबदलासंदर्भातही चर्चा झाली. प्रामुख्याने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत कुणाकडे कोणती जबाबदारी द्यावी यासंदर्भातही चर्चा झाली. महत्वाचे म्हणजे, भाजपने यापूर्वीच विनोद तावडे, सुनील बंसल आणि तरुण चुग यांच्याकडे काही अशा जागांची जबाबदारी दिली आहे, जेथे पक्ष कमकुवत आहे. हे तिन्ही नेते अमित शाह यांच्या विश्वासातील आहेत. सूत्रांच्यामते, भाजपने देशभरातील अशा एकूण 160 जागा निवडल्या आहेत. ज्यांवर भाजप अधिक लक्ष केंद्रित करणार आहे.

 

टॅग्स :BJPभाजपाlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकVinod Tawdeविनोद तावडेAmit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीJ P Naddaजगत प्रकाश नड्डा