नवी दिल्ली : गेल्या महिनाभरापासून शासकीय बंगल्यात अनधिकृतपणे राहत असलेल्या संपुआ सरकारमधील १६ माजी मंत्र्यांना निवासस्थान खाली करण्याबद्दल नोटीस बजावण्यात आली आहे, असे आज सरकारने लोकसभेत सांगितले. या माजी मंत्र्यांना अनधिकृतपणे मुक्काम ठोकल्याबद्दल सुमारे २१ लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे, अशी माहिती नागर विकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी लिखित उत्तरात दिली. यामध्ये जयपाल रेड्डी, सचिन पायलट, फारूख अब्दुल्ला आणि कपिल सिब्बल यांचा प्रामुख्याने समावेश आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}