मंदिरातील दानपेटी फोडून १५ हजार रुपये लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2015 23:57 IST2015-07-09T23:57:31+5:302015-07-09T23:57:31+5:30

अकलूज : संग्रामनगर-अकलूज येथील श्री साईबाबा सेवा ट्रस्टच्या साई मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे १५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केला. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर मंदिराच्या पुजार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

15,000 rupees in the temple and rupture of the temple | मंदिरातील दानपेटी फोडून १५ हजार रुपये लंपास

मंदिरातील दानपेटी फोडून १५ हजार रुपये लंपास

लूज : संग्रामनगर-अकलूज येथील श्री साईबाबा सेवा ट्रस्टच्या साई मंदिरातील दानपेटी फोडून सुमारे १५ हजार रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून पोबारा केला. ही घटना बुधवारी उघडकीस आल्यानंतर मंदिराच्या पुजार्‍याने दिलेल्या फिर्यादीवरून अकलूज पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संग्रामनगर येथील श्री साई मंदिरात राजेंद्र रामचंद्र कुलकर्णी हे पुजारी म्हणून कार्यरत असून मंगळवारी मंदिरातील नित्योपचार आटोपून रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास मंदिर बंद करून आपल्या घरी गेले. यानंतर बुधवारी पहाटे साडेसहाच्या सुमारास मंदिराचा कर्मचारी कुमार पलंगे हा मंदिर झाडण्यासाठी आला असताना मंदिराचा दरवाजा उघडा दिसल्याने त्यांनी पुजारी कुलकर्णी यांना मोबाईलवरून कळविले. कुलकर्णी मंदिरात आल्यानंतर त्यांनी मंदिराच्या गाभार्‍यात पाहिले असता मंदिराचा दरवाजा अज्ञात चोरट्याने उचकटून मंदिरात प्रवेश करीत मंदिराची दानपेटी फोडून दानपेटीतील १५ हजार रूपयांची रोकड लंपास केल्याचे निदर्शनास आले. पुजारी राजेंद्र कुलकर्णी यांनी अकलूज पोलिसात रितसर फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक महेश विधाते करीत आहेत.

Web Title: 15,000 rupees in the temple and rupture of the temple