शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

१४... मौदा... चोरी

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये पळविले

सोन्याच्या दागिन्यांसह २५ हजार रुपये पळविले
मौद्यात भरदिवसा चोरी : मारहाण करून जखमी केले
मौदा : चोरट्यांनी भरदिवसा घरात शिरून फिर्यादीस मारहाण करीत गंभीर जखमी केले. शिवाय, घरातील २५ हजार रुपये रोख व ३० तोळे सोन्याचे दागिने हिसकावून पळ काढला. ही घटना मौदा शहरातील लापका मार्गावर शनिवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
फिर्यादी टंटू महादेव हटवार (७०, रा. लापका रोड, मौदा) यांच्या घरी सलून व इतर दोन दुकाने आहेत. त्यांना दोन मुले व दोन मुली असून, मुले व मुली मुंबईला वास्तव्याला आहेत. त्यांची पत्नीही काही दिवसांपूर्वी मुलाकडे काही कामानिमित्त मुंबईला गेली होती. त्यामुळे ते घरी एकटेच होते. दरम्यान, शनिवारी दुपारी तीन अनोळखी तरुणांनी त्यांच्या घरात प्रवेश केला.
सुरुवातीला त्या तरुणांनी रूम किरायाने मिळेल का, अशी विचारणा त्यांच्याकडे केली. काही वेळातच त्या तरुणांनी त्यांना ढकलत किचनपर्यंत नेले. त्यानंतर त्यांनी चाकू दाखवीत त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी, सोन्याच्या आठ अंगठ्या आणि २५ हजार रुपये रोख एवढा ऐवज हिसकावून घेत पळ काढला. तत्पूर्वी त्यांना जखमी करण्यात आले. सदर चोरटे आपसांत हिंदीत संभाषण करीत असून, ते लापका रोडने पळून गेल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळताच मौदा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी टंटू हटवार यांना सुरुवातीला मौदा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये भरती केले. तिथे त्यांच्यावर प्रथमोपचार केल्यानंतर नागपूरला रवाना करण्यात आले. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, परीविक्षाधीन उपविभागीय पोलीस अधिकारी नवनाथ ढवळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर, मौद्याचे ठाणेदार बी. एम. गायगोले आदींनी घटनास्थळाची पाहणी केली. या प्रकरणी मौदा पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
***