नवी दिल्ली : इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षेच्या जेईई-मुख्य २०२६ च्या पहिल्या सत्राचा निकाल जाहीर झाला असून, यात १२ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाइल (परफेक्ट १००) गुण मिळवण्याची कामगिरी केली आहे. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने सोमवारी ही घोषणा केली असून, या परीक्षेच्या पहिल्या सत्रासाठी १३.०४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. परीक्षेच्या सुरळीत संचालनासाठी आणि देखरेखीसाठी एजन्सीने एक केंद्रीय नियंत्रण कक्ष स्थापन केला होता.
एनटीए स्कोअरची पद्धत
एनटीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ‘एनटीए स्कोअर’ हे सामान्यीकृत (नॉर्मलाइज्ड) गुण आहेत, जे विविध सत्रांमध्ये आयोजित परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांमधील काठिण्य पातळी समान करण्यासाठी वापरले जातात.
हे गुण त्या विशिष्ट सत्रात परीक्षा देणाऱ्या सर्व उमेदवारांच्या सापेक्ष कामगिरीच्या आधारावर निर्धारित केले जातात. उमेदवारांनी मिळवलेले गुण ० ते १०० च्या स्केलमध्ये रूपांतरित केले जातात आणि हे गुण टक्केवारीच्या समान नसतात.
राजस्थानचे वर्चस्व, सर्व १०० पर्सेंटाइल मुले
परफेक्ट १०० गुण मिळविणाऱ्या
१२ विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक विद्यार्थी हे राजस्थान राज्यातील आहेत.
या संपूर्ण यादीत तीन विद्यार्थी राजस्थानचे, दोन आंध्र प्रदेशचे आणि प्रत्येकी एक विद्यार्थी दिल्ली, बिहार, ओडिशा, हरियाणा, महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा राज्यातील आहे.
विशेष म्हणजे, परफेक्ट १०० गुण मिळवणारे सर्व १२ ही विद्यार्थी आहेत.
Web Summary : Twelve students achieved a perfect 100 percentile in the JEE-Main 2024 first session, announced by the National Testing Agency. Over 13 lakh students registered. The NTA uses a normalization process to ensure fair evaluation across different sessions. Most top scorers are from Rajasthan; all are male.
Web Summary : जेईई-मेन 2024 के पहले सत्र में बारह छात्रों ने परफेक्ट 100 पर्सेंटाइल हासिल किए, राष्ट्रीय परीक्षा एजेंसी ने घोषणा की। 13 लाख से अधिक छात्रों ने पंजीकरण कराया। एनटीए विभिन्न सत्रों में निष्पक्ष मूल्यांकन सुनिश्चित करने के लिए सामान्यीकरण प्रक्रिया का उपयोग करता है। अधिकांश शीर्ष स्कोरर राजस्थान से हैं; सभी पुरुष हैं।