शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

१२... गुन्हे... जोड

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या

विष प्राशन करून तरुणाची आत्महत्या
कुही : तरुणाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना कुही पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ससेगाव येथे सोमवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली.
मानसिंग भीमराव जाधव (२४, रा. ससेगाव, ता. कुही) असे मृताचे नाव आहे. मानसिंगने त्याच्या राहत्या घरी विष प्राशन केले. सदर बाब लक्षात येताच घरच्या मंडळींनी त्याला लगेच उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. याप्रकरणी कुही पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***
जळालेल्या महिलेचा मृत्यू
कळमेश्वर : घरी स्वयंपाक करीत असताना स्टोव्हचा भडका उडाल्याने गंभीर जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ब्राम्हणी येथे बुधवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली.
मीनाक्षी प्रमोद उईके (रा. ब्राम्हणी, ता. कळमेश्वर) असे मृत महिलेचे नाव आहे. सदर महिला नेहमीप्रमाणे घरी स्टोव्हवर स्वयंपाक करीत होती. दरम्यान, स्टोव्हचा भडका उडाला आणि तिच्या कपड्यांनी पेट घेतला. यात गंभीररीत्या जळाल्याने तिला नागपूर येथील मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***
महिलेची आत्महत्या
कळमेश्वर : महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कळमेश्वर शहरात बुधवारी रात्री घडली.
शोभा धर्मदास ग्वालानी रा. ब्राम्हणी, ता. कळमेश्वर असे मृत महिलेचे नाव आहे. कळमेश्वर शहरातील नगर परिषदेच्या तलावात गुरुवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास महिलेचा मृतदेह तरंगताना आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर सदर महिलेची ओळख पटली. ती बुधवारी रात्रीपासूून घरून निघून गेली होती, अशी माहिती जाणकारांनी दिली. याप्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
***