शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
3
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
4
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
5
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
6
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
7
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
8
मराठी अभिनेता झाला जुळ्या मुलांचा बाबा! लग्नाच्या ८ वर्षांनी पाळणा हलला, नावंही ठेवली खूपच खास
9
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
10
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
11
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
12
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
13
आजारपण अन् आयुष्यभराची कमाई साफ; कुटुंब अडकते वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत, मध्यमवर्ग संकटात
14
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
15
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
16
हम ‘आप’ के हैं कौन? सत्तेसाठी पक्ष फोडणे ही प्रवृत्ती लोकशाहीच्या आत्म्याला नख लावणारी
17
महामुंबईतील वॉटर मेट्रोला वेग! २६ टर्मिनल्स उभारणार; शहरांना नवे कनेक्शन, काय बदलणार?
18
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
19
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
20
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
Daily Top 2Weekly Top 5

१२... गुन्हे... जोड...०१

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

मेटॅडोरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

मेटॅडोरच्या धडकेत तरुणाचा मृत्यू
खापा परिसरातील अपघात : वाहनचालकास अटक
खापा : भरधाव मेटॅडोरने विरुद्ध दिशेने येणाऱ्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना खापा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खापा शिवारात बुधवारी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास घडली.
सुभाष रामचंद्र बागडे (२६, रा. खापा, ता. सावनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. सुभाष हा एमएच-३१/डीएस-२७४० क्रमांकाच्या मोटरसायकलने खाप्याकडे येत होता. त्याच वेळी डीजेचे बॉक्स घेऊन एमएच-०१/एच-३६५५ क्रमांकाचा भरधाव मेटॅडोर खाप्याहून नागपूरकडे जात होता. दरम्यान, खापा परिसरात या मेटॅडोरने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात सुभाष गंभीर जखमी झाला. त्यातच त्याच्या डोक्यावर डीजेचा बॉक्स कोसळला. त्यामुळे त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी खापा पोलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदविला असून, मेटॅडोर चालक जगदीश मनोहर नरड (४८, रा. नागपूर) याला अटक केली. सदर घटनेचा तपास खापा पोलीस करीत आहे.
***
टिप्परची दुचाकीला धडक, एक ठार
मौदा : भरधाव टिप्परने मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या दुुचाकी चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना मौदा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावळी फाटा परिसरात बुधवारी मध्यरात्री घडली.
अरुण मुन्नालाल गौर (३५, रा. नागपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. अरुण हा एमएच-३१/बीव्ही-५७७० क्रमांकाच्या मोटरसायकलने जात होता. दरम्यान, सावळी फाटा परिसरात एमएच-३६/१६५८ क्रमांकाच्या भरधाव टिप्परने त्याच्या मोटरसायकलला धडक दिली. यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या प्रकरणी मौदा पोलिसांनी भादंवि २७९, ३०४ (अ) अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
***
विहिरीत उडी घेऊन आत्म्हत्या
कोंढाळी : विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोंढाळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिचोलीपठार येथे बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारस घडली.
हरिश्चंद्र नेहारे (५०, रा. चिचपठार) असे मृताचे नाव आहे. हरिश्चंद्रने गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेतली. काहींनी त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला, मात्र यश आले नाही. त्याच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. या प्रकरणी कोंढाळी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.