शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

यंदा 'वरुणराजा' धुवांधार बरसणार; देशात १०२ टक्के पाऊस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2020 19:40 IST

मॉन्सूनचा हा अंदाज ६ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून..

ठळक मुद्देउत्तर पश्चिम भारतात १०७ टक्के

पुणे : देशात पावसाच्या चार महिन्यांत पाऊसमान सर्वसाधारण राहणार असून, संपूर्ण देशात १०२ टक्के पाऊस पडणार असल्याचा दुसर्‍या टप्प्यातील अंदाज भारतीय हवामान विभागाने सोमवारी जाहीर केला. त्यात ४ टक्के कमी-अधिक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मॉन्सून सर्वत्र चांगला होण्याची आशा निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागाने आज जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत विभागावार किती पाऊस होईल, याचा अंदाज व्यक्त केला असून, पूर्व भारत वगळता सर्वत्र १०० टक्क्यांहून अधिक पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जुलै महिन्यात संपूर्ण देशात १०३ टक्के, तर ऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मॉन्सूनचा हा अंदाज ६ वेगवेगळ्या घटकांवर अवलंबून व्यक्त केला जातो.

गेल्या काही वर्षांपासून भारतीय हवामान विभागाने विकसित केलेल्या मॉन्सून मिशन मॉडेलद्वारे मॉन्सूनचा अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात झाली आहे.  या मॉडेलनुसार चार महिन्यांत १०४ टक्के पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने जाहीर केलेल्या अंदाजानुसार देशात ९० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता केवळ ५ टक्के आहे.सर्वसाधारणपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता (९० ते ९६ टक्के) १५ टक्केआहे. तसेच ९६ ते १०४ टक्के पावसाची शक्यता ४१ टक्के  आहे.सर्वसाधारणपेक्षा अधिक (१०४ ते ११० टक्के) पावसाची शक्यता २५ टक्के आहे. आणि ११० टक्क्यांपेक्षा अधिक पावसाची शक्यता १४ टक्के आहे. हे पाहता पाऊस कमी होण्याची शक्यता केवळ ५ टक्के आहे. याउलट सर्वसाधारण पाऊस होण्याची शक्यता ४१ टक्के इतकी आहे.जुलै महिन्यात संपूर्ण देशात १०३ टक्के पावसाची शक्यता आहे. तर ऑगस्टमध्ये सर्वसाधारणापेक्षा थोडा कमी ९७ टक्के पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यात मॉडेलनुसार ९ टक्के कमी-अधिक होण्याची शक्यता आहे..........संपूर्ण देशात १०२ टक्के (४ टक्के कमी-अधिक)उत्तर पश्चिम भारत १०७ टक्के (८ टक्के कमी-अधिक)मध्य भारत १०३ टक्केदक्षिण भारत १०२ टक्केउत्तर पूर्व भारत ९६ टक्के........संपूर्ण भारतात जुलै महिन्यात १०३ टक्के पाऊसऑगस्ट महिन्यात ९७ टक्के पाऊस (९ टक्के कमी-अधिक)

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसweatherहवामानFarmerशेतकरी