झेन कारला अपघात, पोलीस कर्मचारी ठार तर नगरसेवकासह 4 जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2019 07:52 IST2019-06-18T07:51:54+5:302019-06-18T07:52:36+5:30
वावी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी रवींद्र संपत जाधव

झेन कारला अपघात, पोलीस कर्मचारी ठार तर नगरसेवकासह 4 जखमी
सिन्नर (नाशिक): सिन्नर-शिर्डी रस्त्यावर झेन कारला फॉर्च्युनर गाडीने धडक दिल्यामुळे वावी पोलीस ठाण्याचे वाहतूक कर्मचारी जागीच ठार झाले. मंगळवारी पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास सदर अपघात झाला. या अपघातात चार जण जखमी झाल्याचे समजते. जखमीमध्ये मुंबईतील एका नगरसेवकासह त्यांचे मित्र असल्याचे समजते.
वावी पोलीस ठाण्यातील वाहतूक पोलीस कर्मचारी रवींद्र संपत जाधव (33) हे झेन कारने वावीकडून सिन्नरकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या फॉर्च्युनर कारने देवपूर फाट्याजवळ या झेन कारला जोरदार धडक दिली. त्यात पोलीस शिपाई जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. जाधव यांच्या पश्चात पत्नी व मुलगा आहे.