म्हाळदे शिवारात पादचारी तरुण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:48 IST2021-02-05T05:48:46+5:302021-02-05T05:48:46+5:30

मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर म्हाळदे शिवारात पुलावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ...

Young pedestrian killed in Mhalade Shivara | म्हाळदे शिवारात पादचारी तरुण ठार

म्हाळदे शिवारात पादचारी तरुण ठार

मालेगाव : मुंबई - आग्रा महामार्गावर म्हाळदे शिवारात पुलावरुन भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी अन्सारी मुबश्शीर फराज मुदश्शीर हुसेन (२०) हा तरुण ठार झाला. काल बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अन्सारी कलीम रईस अहमद (३२, रा. अब्दुल्लानगर) यांनी पवारवाडी पोलिसात याविषयीची फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अज्ञात वाहनाने धडक दिल्याने पादचारी अन्सारी मुबश्शीर याच्या डोक्याला व छातीला जबर मार लागून त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असल्याने व अपघाताची खबर न देता पळून गेल्याने अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास जमादार पगारे करत आहेेत.

Web Title: Young pedestrian killed in Mhalade Shivara