रस्ता सुरक्षितता कार्यशाळेत उपस्थितीचा विश्वविक्रम

By Admin | Updated: January 20, 2017 00:58 IST2017-01-20T00:58:37+5:302017-01-20T00:58:48+5:30

अशोका बिल्डकॉनला बहुमान : २७०० नागरिकांनी नोंदविला सहभाग

World Record of Attendance in Road Safety Workshop | रस्ता सुरक्षितता कार्यशाळेत उपस्थितीचा विश्वविक्रम

रस्ता सुरक्षितता कार्यशाळेत उपस्थितीचा विश्वविक्रम

नाशिक : रस्ता सुरक्षिततेविषयी वाहनचालकांसह नागरिकांध्ये जनजागृती व्हावी, या उद्देशाने अशोका बिल्डकॉन यांनी एकाच वेळी २७०० नागरिकांमध्ये जनजागृती करून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. गुरुवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात झालेल्या कार्यक्रमातील उपस्थितींची ‘गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाली आहे.
‘रस्त्याने दूरवर जाण्यासाठी घ्या सुरक्षित धडे’ या अनोख्या कार्यक्रमात नागरिक, विद्यार्थी असे सर्व घटक सहभागी झाले.
यावेळी पोलीस उपायुक्त विजय पाटील यांनी या कार्यक्रमादरम्यान उपस्थित पालक, विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वाहतूक नियम पालनाबाबत मार्गदर्शन केले. यावेळी दृकश्राव्य सादरीकरणातून विविध उदाहरणे आणि व्हिडीओंचेही सादरीकरण करण्यात आले. तसेच अशोका बिल्डकॉनचे व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख यांच्या हस्ते अ‍ॅण्ड्रॉइड ‘अशोक रोड सेफ्टी अ‍ॅप’च्या निर्मितीची संकल्पना स्पष्ट करून अशोका समूहातील प्रत्येक घटकाने आपल्या भ्रमणध्वनीमध्ये हे अ‍ॅप इन्स्टॉल करण्याचे आवाहन के ले. तसेच रस्ता सुरक्षिततेवर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अखेरीस मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षकांकडून अशोका समूहाची ‘गिनीज बुक आॅफ रेकॉर्ड’मध्ये नोंद झाल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी या उपक्रमासाठी ग्रिनीज बुक आॅफ रेकॉर्डचे परीक्षक स्वप्नील डिंग्रीकर आणि सुधीर कुलकर्णी, डॉ. वासुदेव झांबरे यांनी या आधी नोंदवण्यात आलेला २१६८ सहभाग धारकांची नोंद मोडीत काढत २ हजार ७०० सहभाग धारकांच्या नोंदीने हे नवीन रेकॉर्ड नोंदवण्यात आल्याची माहिती दिली. या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक अशोक कटारिया, व्यवस्थापकीय संचालक सतीश पारख, आशिष कटारिया, आदित्य पारख, आशा कटारिया, आस्था कटारिया यांच्यासह पोलीस प्रशासनातील विविध अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्योम श्रीवास्तव यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: World Record of Attendance in Road Safety Workshop