शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

मजदूर संघाचे धरणे आंदोलन सुरूच

By admin | Updated: January 20, 2016 23:46 IST

सदोष नोटा छपाई प्रकरण : कामगारांचे निलंबन मागे घेण्याची मागणी

नाशिकरोड : चलार्थपत्र मुद्रणालयातून ‘सिक्युरिटी तार’ नसलेल्या १ हजाराच्या ३०० दशलक्ष (मिलीयन) सदोष नोटा छपाई प्रकरणी मुद्रणालय व्यवस्थापनाने तिघा कामगारांचे निलंबन मागे घ्यावे या मागणीसाठी बुधवारी मजदूर संघाच्या वतीने दिवसभर धरणे आंदोलन करण्यात आले.मुद्रणालय महामंडळाच्या होशंगाबाद येथील कागद निर्मितीच्या कारखान्यातून जेलरोड येथील चलार्थपत्र मुद्रणालयात एक हजाराच्या नोटा छापण्यासाठी कागद पाठविण्यात आलेल्या कागदामध्ये ‘सिक्युरिटी तार’ नव्हती. चलार्थपत्र मुद्रणालयाला १ हजाराच्या ५०० मिलियन नोटा छापण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी ३०० मिलियन नोटा छापण्यात आल्या त्यापैकी छापलेल्या १०० मिलियन नोटा मुद्रणालयातून रिझर्व्ह बॅँकेकडे पाठविल्यानंतर बॅँकेने त्या नोटा राष्ट्रीयीकृत बॅँकामार्फत बाजारात व्यवहारासाठी चलनात आणल्या. रिझर्व्ह बॅँकेने तत्काळ राष्ट्रीयीकृत बॅँकांना बाजारामध्ये चलनात गेलेल्या ‘सिक्युरिटी तार’ नसलेल्या नोटा जमा करण्याचे आदेश दिले आहे.केंद्राच्या अर्थ खात्याने या घटनेची गंभीर दखल घेऊन चौकशी सुरू केली आहे. याप्रकरणी होशंगाबाद कागद निर्मिती कारखान्याचे व्यवस्थापक यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. तर होशंगाबाद कारखान्यातील तांत्रिक विभागाचे व्यवस्थापक व सहायक व्यवस्थापक यांना लागलीच निलंबित करण्यात आले होते. मुद्रणालय व्यवस्थापनाने एक हजार रुपयाच्या सदोष नोटा छपाईप्रकरणी सीएनपीच्या कंट्रोल विभागातील साहेबराव उगले, रमेश देवरे, बंडू संवत्सकर या तीन कामगारांना सोमवारी सायंकाळी निलंबीत केले. तर उपनियंत्रण अधिकारी मरीयन पॉल, कंट्रोल विभाग निरीक्षक संजय दाभाडे, जे.डी. देशमुख, व्ही.व्ही. बुरबुरे, सहायक निरीक्षक संजय थोरात, गणेश औटी या सहा अधिकाऱ्यांना प्रशासनाकडून ‘दोषारोपपत्र’ देण्यात आले.सदोष नोटा छपाईप्रकरणी तीन कामगारांचे केलेले निलंबन मागे घेण्यात यावे, या मागणीसाठी दुसऱ्या दिवशीदेखील महाप्रबंधक संदीप जैन यांच्या कार्यालयाबाहेर मजदूर संघाच्या वतीने सायंकाळ पर्यंत धरणे आंदोलन करण्यात आले. मजदूर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी महाप्रबंधक जैन यांच्याशी निलंबन रद्द करण्याबाबत चर्चा केली; मात्र व्यवस्थापनाने कुठलाही निर्णय अथवा आश्वासन दिले नाही. यामुळे गुरुवारी देखील मजदूर संघाच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबत मजदूर संघाचे पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही. आपला पॅनलने कामगारांवरील निलंबन रद्द करण्यासाठी आंदोलन तीव्र केल्यास मजदूर संघाच्या पाठीशी राहणार असल्याचे अशोक गायधनी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)