शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
2
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
3
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
4
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
5
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
6
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
7
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
8
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
9
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
10
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
11
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
12
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
13
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
14
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
15
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
16
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
17
IPL All Time Records : कमालीचा योगायोग! विराट-रोहितनं एकाच सामन्यात केली धोनीच्या विक्रमाशी बरोबरी
18
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
19
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
20
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

महिला आरक्षणामुळे चित्र पालटणार

By admin | Updated: January 8, 2017 00:46 IST

घडामोडींना वेग : वणी गटात इच्छुकांची निराशा

प्रवीण दोशी वणी
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी राजकीय आखाडा तयार झाला असून, वणी गट व गण महिला आरक्षित झाल्याने विद्यमानांचा हिरमोड झाला आहे. यामुळे दुसऱ्या मतदारसंघाची चाचपणी वरकरणी सुरू झाली आहे.
हक्काचा मतदारसंघ महिलांच्या ताब्यात गेल्याने राजकीय चित्र पूर्णत: बदलले आहे. वणी व लखमापूर अशा दोन गणांचा समावेश असलेल्या वणी गटावर शिवसेनेचे बाळासाहेब गांगुर्डे जिल्हा परिषद गटात, वणी गणात शिवसेनेचे अ‍ॅड. विलास निरगुडे व लखमापूर गणात शिवसेनेचे गणेश शार्दुल विद्यमान सदस्य आहेत. गट व गण शिवसेनेच्या ताब्यात असल्याने सेनेला हा गड सुरक्षित आहे, असे मानले जाते. बाळासाहेब गांगुर्डे यांनी राष्ट्रवादीच्या सुरेश गांगुर्डे यांचा अवघ्या १८ मतांनी पराभव करून जिल्हा परिषद सदस्याचा मान मिळविला होता, तर वणी गणातून अ‍ॅड. विलास निरगुडे यांनी मोठ्या फरकाने बाजी मारली. लखमापूर गणातील गणेश शार्दुल यांनीही विजयश्री खेचून आणली; मात्र आता चित्र बदलले आहे. कसबे वणी गट व गटातील दोन्ही गण अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहेत. कसबे वणी गटातील गावे पुढीलप्रमाणे- वणी गण : वणी, मावडी, बाबापूर, मुळाणे, संगमनेर, रामनगर, ओझरखेड, कृष्णगाव.
लखमापूर गण : लखमापूर करंजवण, खेडले पिंपरखेड, दहेगाव, पुणेगाव, फोपशी, काजीमाळे, वलखेड, कादवा, म्हाळुंगी, ओझे, वागळुद, म्हेळुस्के परमोरी आदि २२ गावांचा गटात समावेश आहे. सुमारे ४५ हजारांच्या जवळपास मतदार आहेत. जि. प. गटातून सुभाष गांगुर्डे यांनी, तर पंचायत समितीच्या माध्यमातून शिवसेना गटनेता म्हणून विलास निरगुडे व गणेश शार्दुल यांनी विकासाला अग्रक्र म दिला असला तरी तिन्ही जागा यंदा महिलांसाठी आरक्षित झाल्याने विद्यमानांचा अपेक्षाभंग झाला आहे. गटासाठी राष्ट्रवादीतर्फे वणीच्या विद्यमान सरपंच सुनीता भरसठ यांची दावेदारी प्रबळ मानली जाते आहे, तर ग्रामपंचायत सदस्य छाया गोतरणे याही स्पर्धेत आहेत.
शिवसेनेने आपले पत्ते अजून उघडलेले नसून ऐनवेळी सक्षम व प्रभावी उमेदवार मैदानात उतरविण्याची व्यूहरचना आखली आहे. कॉँग्रेसने स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे, तर माकपही निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी तयारीला लागला आहे. मिनी मंत्रालय म्हणून परिचित असलेल्या जिल्हा परिषदेत जाण्यासाठी अनेक इच्छुकांनी पत्नींना उभे करून सत्तेची दोरी हातात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू केल्याची चर्चा सध्या गटात रंगत आहे. दरम्यान, चालू निवडणुकीचे गणित पक्षापेक्षा व्यक्ती हे असू शकते, याचाच आधार घेत इच्छुक सावधगिरीने पावले टाकत आहेत. हीच स्थिती थोड्या फार फरकाने पंचायत समितीच्या दोन्ही गणांसाठीसुद्धा आहे. मात्र या ठिकाणी इच्छुकांची वानवा असल्याने जिल्हा परिषद नाही तर पंचायत समिती अशीही शक्यता नाकारता येत नाही. वणी गट तसेच दोन्ही गणांवर प्रस्थापित वर्चस्व राखण्यासाठी नियोजन आखत असले तरी अस्तित्वाची लढाई सोपी नक्कीच नाही.