शहरं
Join us  
Trending Stories
1
“छत्रपती शिवरायांबद्दल एवढेच वाटत असेल, तर शिवजयंतीला देशभरात सुट्टी जाहीर करा”: उद्धव ठाकरे
2
सासू-जावयाच्या लव्ह स्टोरीचा 'दी एंड'! नेपाळ सीमेजवळ दोघेही ताब्यात; महिलेनं रडत-रडत केला धक्कादायक खुलासा
3
तामिळनाडूला जाऊन जबाब नोंदवायला काय हरकत आहे? कुणाल कामराला अटक न करण्याचे कोर्टाचे निर्देश
4
आधी वडेट्टीवार, आता सपकाळ; मंगेशकर कुटुंबावर टीकेचे बाण, म्हणाले, “घटनेवरील मौन अमानुष”
5
गर्भवती मृत्यू प्रकरणामुळे गोत्यात आलेल्या डॉ. घैसास यांना पोलीस प्रोटेक्शन..! 
6
भयानक! सवाई माधोपुरच्या त्रिनेत्र गणेश मंदिरात वाघ आला, सहा वर्षांच्या मुलाला घेऊन गेला
7
कागदपत्रे नसतील तर जुन्या मशिदींचे काय होणार? सर्वोच्च न्यायालयाने 'वक्फ बाय युजर'वर मागितले केंद्राकडे उत्तर
8
सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश पुन्हा एकदा बदलणार; सहा महिन्यांसाठी बी आर गवई यांच्या नावाची शिफारस
9
"लातों के भूत बातों से नहीं मानते...!"; CM योगींच्या वक्तव्यावर ममता बॅनर्जी जाम भडकल्या, म्हणाल्या...
10
"कोर्टाच्या आदेशाची माहिती नव्हती"; नागपूर दंगलीच्या आरोपीचे घर पाडल्यानंतर पालिकेने मागितली माफी
11
पतीलाही पत्नीकडून पोटगी मिळू शकते? सर्वांना माहितीये की केवळ पत्नीलाच मिळते, कायद्यात तरतूद...
12
"चंद्रकांत खैरे शिवसेनेचे शंकराचार्य...! कडवट शिवसैनिक कसे झालात?"; राऊतांच्या प्रश्नाला खैरेंनी दिलं असं उत्तर!
13
थेट टीम इंडियात नोकरीची सुवर्णसंधी, कोण करू शकतं अर्ज? जाणून घ्या
14
“गांधी कुटुंब कायद्यापेक्षा मोठे नाही, सगळ्या देशाला माहितीये की...”; विनोद तावडेंचा पलटवार
15
"गरज पडेल तेव्हा माझा वापर..."; त्रासाला कंटाळून कर्मचाऱ्याने टॉयलेट पेपरवरच दिला राजीनामा
16
उदय सामंत आणि संदिपान भुमरे अचानक मनोज जरांगेंच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
17
दीड हजारांचा जमाव, टेरेसवरुन दगडफेक; नाशिकमध्ये पोलिसांवर हल्ला, २१ कर्मचारी जखमी
18
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी तेजी कायम! बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव, ऑटोसह 'या' सेक्टरमध्ये घसरण
19
जयदीप अहलावतला होती रणबीरच्या 'रामायण'मधील 'या' भूमिकेची ऑफर, दिला नकार कारण...
20
बापरे! गळ्यात चप्पलांचा हार, रखरखत्या उन्हात अनवाणी...; विद्यार्थ्यांसाठी शिक्षकाची धडपड

साध्या गणवेशातील महिला पोलिसांचे गर्दीच्या ठिकाणांवर असणार लक्ष : विश्वास नांगरे पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2019 16:39 IST

सीटबेल्ट, हेल्मेट तपासणी सुरू असलेल्या नाक्यांवर संशयित दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचीही कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला पोलिसांना संशयास्पद हालचाली करताना कोणी आढळून येताच तत्काळ त्याचे चित्रीकरण करून संबंधित पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यंत्रणेवरून माहिती कळविली जाणार आहे.

ठळक मुद्देरोडरोमीयोंनाही चाप बसण्यास मदत होईल. विनयभंगाच्या तक्रारीही शहर व परिसरात वाढल्या आहेत.

नाशिक : भाजी बाजार, महाविद्यालय, शाळांचा परिसर, रूग्णालयांच्या आवार, बसस्थानके, मॉल परिसरासारख्या गर्दीच्या ठिकाणी महिला, युवतींची असलेली गर्दी लक्षात घेता त्यांची छेड काढण्याचे प्रकार वाढत आहेत. मागील काही महिन्यांत विनयभंगाच्या तक्रारीही शहर व परिसरात वाढल्या आहेत. या घटना रोखण्यासाठी शहरातील गर्दीच्या ठिकाणांवर आता साध्या वेशातील महिला पोलिसांची ‘नजर’ राहणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी दिली आहे.पोलीस आयुक्तालयात गुरूवारी (दि.१६) सिनिअर जर्नलिस्ट फोरमची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीला उपआयुक्त अमोल तांबे, गुन्हे शाखेच्या उपआयुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, माधुरी कांगणे यांच्यासह फोरमचे सदस्य उपस्थित होते. यावेळी नांगरे पाटील यांनी शहरातील कायदासुव्यवस्थेविषयी आढावा घेत उपस्थितांसोबत चर्चा केली. शहरात पोलिसांकडून सुरू असलेली हेल्मेट, सीटबेल्टसक्ती तपासणी मोहीम, घरफोडी, सोनसाखळी चोरी, लूटमार, वाहनचोरी आदि घटनांविषयी चर्चा करण्यात आली. शहरात होणाऱ्या रस्ते अपघातात मेंदूला जबर मार लागून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाण वाढल्याने सीटबेल्ट सक्तीची तपासणीवर लक्ष दिले जात असल्याचे नांगरे पाटील म्हणाले.सीटबेल्ट, हेल्मेट तपासणी सुरू असलेल्या नाक्यांवर संशयित दुचाकी, चारचाकी वाहनचालकांचीही कसून तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. महिला पोलिसांना संशयास्पद हालचाली करताना कोणी आढळून येताच तत्काळ त्याचे चित्रीकरण करून संबंधित पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यंत्रणेवरून माहिती कळविली जाणार आहे. जेणेकरून गुन्हेगारांसह, रोडरोमीयोंनाही चाप बसण्यास मदत होईल.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयVishwas Nangare Patilविश्वास नांगरे-पाटील