शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

देवळाणे येथे भिंत पडून महिलेने जीव गमावला

By admin | Updated: March 2, 2016 22:58 IST

अंदरसूल परिसरात अस्मानी संकटाचा कहर; बैलजोडी ठार

अंदरसूल : परिसरातील देवळाणे येथे वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळीने एका घराची भिंत पडून ९० वर्षीय जिजाबाई निवृत्ती काळे यांचा दुर्दैवी अंत झाला, तर खामगाव येथील शेतकरी रवींद्र शंकर आहिरे यांच्या ६० हजारांच्या बैलजोडीवर वीज पडून बैलजोडी जागीच ठार झाली व बैलांशेजारी बांधलेल्या गायीचे चारही पाय निकामी होऊन जखमी झाली.सरकारच्या उदासीनतेमुळे शेतमालाला मिळत असलेल्या कवडीमोल भाव यामुळे बेजार झालेल्या बळीराजावर आता अस्मानी संकटाचा अवकाळी कहर सुरू झाल्याने बळीराजा हवालदिल झाला आहे.येवला तालुक्याच्या पूर्व भागात अचानक आलेल्या अवकाळी पावसाने परिसरात चांगलेच थैमान घातले असून, अंदरसूल, खामगाव, गवंडगाव, बोकटे, देवळाणे, उंदीरवाडी आदि गावांसह परिसरातील खेड्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. आधीच संकटात असलेल्या शेतकऱ्यांची असमानी संकटाने चांगलीच दमछाक झाली आहे. त्यात अवकाळीने घेतलेले रौद्र रूप बघून शेतकरी चांगलाच हताश झालेला असल्याचे चित्र आहे.गवंडगाव शिवारातही अवकाळीने थैमान घातले असून, येथील शेतकरी सजन रामचंद्र गायकवाड यांच्या घराचे पत्रे उडून गेले, तर संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कामगार तलाठी पी. एस. चोपडे यांनी पंचनामा करून गायकवाड यांचे ७७ हजार रु पयांचे नुकसान झाल्याचे पंचनाम्यात म्हटले आहे, तर मीना सुदाम भागवत यांच्या शेतातील घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यांच्या घराच्या छताचे पत्रे उडून दूरवर जाऊन पडले त्यात त्यांचे ६१ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. उंदीरवाडी शिवारातील राजाराम गोबजी गोराणे यांच्या घराच्या छताचेदेखील पत्रे उडाले असून, घराचेही मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. दरम्यान, देवळाणे येथील वृद्ध महिला जिजाबाई निवृत्ती काळे यांच्यासह खामगाव येथील बैलजोडीच्या दुर्दैवी मृत्यूच्या घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर)