शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या महासभेत वादळी चर्चा

By admin | Updated: July 21, 2016 01:04 IST

मालेगाव : कॉँग्रेसचा सभात्याग; विविध विषयांना मंजुरी

आझादनगर : मालेगाव मनपाच्या रुग्णवाहिकेचे दर निश्चित करणे, मनपा रुग्णालयात विशेष प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक करणे, मनपाची जिमखान्यासाठी आरक्षित जागा तालुका क्रीडा संकुलास देणे व मनपा शाळेत इयत्ता आठवीचे वर्ग सुरू करावे आदि विषयांवर मनपा महासभेत जोरदार चर्चा झाली.मनपाच्या रूग्णालयात स्त्रीरोग तज्ज्ञाच्या विषयाबाबत महापौरांनी चर्चेस नकार दिल्याने काँग्रेस नगरसेवकांनी सभात्याग केला; तर क्रीडा संकुलास जागा देण्याबाबत या विषयात गौडबंगाल असून त्यात महापौरांचे हित असल्याचा आरोप करीत नगरसेवक गुलाब पगारे यांनी सभात्याग केला. महासभेस राष्ट्रगीतान सुरूवात झाली. महाराष्ट्र मनपा अधिनियम १९४९ चे कलम ४४ नुसार मनपाच्या दोन रूग्णवाहिका कार्यरत असून त्याचे दर निश्चित करण्याचे अधिकार कुणाचे यावर चर्चा करण्यासाठी विषय घेण्यात आला. यावेळी असलम अन्सारी यांनी सांगितले की, पूर्वी परतीस पाच रूपये प्रतिकिमी प्रमाणे भाडे आकारले जात होते. मात्र आज १२ रूपये प्रमाणे भाडे आकारणी करण्यात येत आहे. त्यामुळे गोरगरीबांना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. यावर आरोग्य अधिकारी डॉ. डांगे उत्तर देण्यासाठी आले असता काँग्रेस सदस्यांनी त्यांच्या नियुक्तीवरच आक्षेप घेत गंभीर आरोप केले. ज्या डॉक्टरांची अधिकृत नियुक्तीच झाली नाही तो भाडेवाढीचे पत्र कसे देतो व त्यास अधिकार कुणी दिले, असा प्रतिसवाल केला. यावर उपायुक्त गोसावी यांनी मान्य केले की त्यांची तोंडी आदेशान्वये नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच शासनाकडून अधिकृत नियुक्तीपत्र देण्यात येईल. त्यावर महापौरांनी मागील ५ रूपये प्रतिकिमी दरास मंजुरी दिली. गुरूवार वॉर्डातील स. नं. १८१/१ या खाजगी जमिनीतून दोन्ही महामार्गास जोडणारा रस्ता जाणार आहे. त्यास खाजगी वाटाघाटी करुन १६.१७ च्या बाजार मूल्यनुसार खरेदी करुन संपादन करणेस मंजुरी देण्यात आली. मालधे घरकुल योजनेसाठी विद्युत पुरवठा करणेकामी उपकेंद्रास ३६०० चौ. मी. जागा देण्यास मंजुरी देण्यात आली.मनपा शाळेत इयत्ता आठवीस मान्यता देवून बढतीच्या प्रतिक्षेत अनेक शिक्षक सेवानिवृत्त होत आहे. त्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यावर शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी म्हणाले की, उर्दू शाळा क्रमांक ८८, ३८, ५७ मध्ये मागणी प्रमाणे इयत्ता आठवीचे वर्ग सुरू आहेत व शिक्षकांचे नियोजन सुरू असून शिक्षकांना बढती देण्यात येईल असे आश्वासन दिले. महासभेत प्रामुख्याने शहरातील वर्तमान पत्रे व नागरिकांच्या तक्रारी, आंदोलनाची सभागृहात दखल घेतली गेल्याचे पहावयास मिळाले. त्यावर मदन गायकवाड, रिजवान खान, अब्दूल मलिक यांनी स्वच्छता विभागाच्या प्रमुख निरीक्षक गोविंद परदेशी यांना धारेवर धरले. यावर आयुक्तांनी हस्तक्षेप करीत मनपा सदस्यांना अवघा काही वेळ देण्याची विनंती करीत नियोजनाबाबत सविस्तर माहिती दिली. मनपाच्या रूग्णालयात विशेष प्रसुती तज्ज्ञ डॉक्टरांच्या आडमुठे धोरणामुळे गत दोन महिन्यापासून शस्त्रक्रिया बंद आहेत. यावेळी काँग्रेस नगरसेवक यांनी जोरदार प्रहार करीत गोरगरीबांना कर घेवून आरोग्य सेवा देवू शकत नाही. ज्यांच्यामुळे सामान्य रूग्णालयाचा पूर्णत: बोजवारा उडाला. अशा डॉक्टरांची मनपाच्या आरोग्य अधिकारीपदी नियुक्ती केली गेली ते काय दिवे लावणार आहेत, असा प्रश्न केला. याविषयावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने काँग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.