शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव वनपरिक्षेत्रातील वन्यजीव पाण्याअभावी कासावीस

By admin | Updated: March 30, 2017 00:59 IST

मालेगाव, सटाणा, ताहाराबाद परिसरातील ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनपरिक्षेत्रातील ३४८ वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे

अतुल शेवाळे : मालेगावमालेगाव, सटाणा, ताहाराबाद परिसरातील ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनपरिक्षेत्रातील ३४८ वन्यजिवांचा अधिवास धोक्यात आला आहे. सध्या कसमादे परिसरातील तपमानाने चाळिशी गाठली आहे. असे असताना वनविभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे यंदा जंगलांमध्ये पाणवठे व वनतळे निर्मितीचे काम हाती घेण्यात आले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी अन्न व पाण्याच्या शोधार्थ वन्यजिवांनी मानवी वस्तीकडे धाव घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही वर्षांपासून कसमादे परिसरात दुष्काळसदृश स्थिती निर्माण झाली होती. यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेती, शिवारे बहरली होती; मात्र सध्या वैशाख वणव्याची धग बसू लागली आहे. तपमानाचा पारा ४३ अंशावर पोहोचला आहे. ग्रामीण भागात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. माणसांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नसताना जंगलातील प्राण्यांना पाणी कोठून उपलब्ध होणार? मालेगाव उपविभागीय वन कार्यालयाच्या कक्षेत मालेगाव, सटाणा व ताहाराबाद परिसरातील जंगलक्षेत्राचा समावेश आहे. या ८१ हजार २१६.२६८ हेक्टर वनक्षेत्रात यंदा एकही वनतळे वा पाणवठे निर्माण करण्यात आले नाहीत. पाणवठे व वनतळे निर्मितीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचा दावा येथील वनविभाग कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केला आहे. शासनाचा लालफितीचा कारभार व प्रस्ताव मंजुरीसाठी लागणारा वेळ यात वन्यजिवांचे काय होणार, असा सवाल प्राणिमित्रांनी व्यक्त केला आहे. सन २०१४-१५ मध्ये १६२ वनतळी बनविण्यात आली होती, तर चिंचवे, निंबायती, टेंभे, जाखोड, मानूर, मोरदरा, वाडीचौलेर, पिंपळदरे, सकर आदि ठिकाणी १३ पाणवठे निर्माण करण्यात आले होते. उन्हाची तीव्रता भयानक आहे. कसमादे परिसरात उष्णतेची लाट पसरली आहे. जंगल परिक्षेत्रात पाणी उपलब्ध नसल्याने प्राण्यांनी अन्न व पाण्याच्या शोधार्थ मानवी वस्त्यांकडे धाव घेतली आहे.