प्रेयसी, पतीकडून पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 01:05 IST2017-09-11T01:05:03+5:302017-09-11T01:05:09+5:30

प्रेयसी व तिच्या आजोबाच्या मदतीने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास गोरेराम लेनमध्ये घडली़ याप्रकरणी पती, प्रेयसी व तिचे आजोबा या तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़

Wife beaten by husband, husband | प्रेयसी, पतीकडून पत्नीला मारहाण

प्रेयसी, पतीकडून पत्नीला मारहाण

नाशिक : प्रेयसी व तिच्या आजोबाच्या मदतीने पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याची घटना शुक्रवारी (दि़८) रात्रीच्या सुमारास गोरेराम लेनमध्ये घडली़ याप्रकरणी पती, प्रेयसी व तिचे आजोबा या तिघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली आहे़
सरकारवाडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोरेराम कॉम्प्लेक्समधील विशाल वामन वाड याची पत्नी प्रियंका वाड ही गुरुवारी (दि़७) न सांगता निघून गेली होती़ याचा राग येऊन पती विशाल याने रात्री पावणेनऊ वाजेच्या सुमारास पत्नी प्रियंकास शिवीगाळ करून तिचे डोके जोराने भिंतीवर आदळले़ तर घराशेजारी राहणारी संशयित सुखदा खांडेकर व तिचे आजोबा देशपांडे यांनीही प्रियंकाला शिवीगाळ करून मारहाण करून काटा काढण्याची धमकी दिली़ या मारहाणीत जखमी झालेल्या प्रियंकास तिच्या वडिलांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून, तिच्यावर उपचार सुरू आहेत़ याप्रकरणी सरकारवाडा पोलिसांनी विशाल वाड, सुखदा खांडेकर व तिचे आजोबा देशपांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे़

 

Web Title: Wife beaten by husband, husband