शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
2
राज्यपालांनी ११८ मागितले, विजयने जमविले...! गाठला बहुमताचा आकडा, त्रिशंकू विधानसभेचा पेच सुटला
3
IPL 2026: अनोळखी मुलींकडून खेळाडूंना धोका, हॉटेलची अचानक होणार तपासणी, BCCIचा 'अलर्ट मोड'!
4
ठरले! पश्चिम बंगालमध्ये सुवेंदु अधिकारी मुख्यमंत्री होणार; रूपा गांगुलींसह उत्तर बंगालला दुसरे उपमुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता
5
Latest Marathi News LIVE: LIVE: नाशिक TCS प्रकरण: शाहरूख कुरेशी, रझा मेमनला ५ दिवसांची पोलीस कोठडी
6
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
7
साध्या गणवेशात २० पोलीस, चार दिवस ठेवली नजर; निदा खानला कसे पकडले?
8
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनेल का विजय थलपती?
9
विजयला मदत करू शकत होता ३२ वर्षांपूर्वीचा कोर्टाचा एक निकाल; राजभवनाशी संघर्ष अन् तामिळनाडूच्या सत्तेची चावी...
10
काकडी की 'स्लो पॉयझन'? विकत घेण्यापूर्वी १०० वेळा विचार करा; Video पाहून सरकेल पायाखालची जमीन
11
नवी ७-सीटर इलेक्ट्रिक SUV Lexus 'TZ' लाँच; ५३० किमी रेंज, अवघ्या ३५ मिनिटांत होणार चार्ज! बघा फीचर्स
12
"आम्हाला काँग्रेसपासून वेगळं बसवा"; कनिमोझींचं थेट लोकसभा अध्यक्षांना पत्र; तामिळनाडूच्या राजकारणात मोठा भूकंप
13
विजयने व्हॉट्सअपवर पाठिंबा मागितला, हा तर घमेंडीपणा...; VCK चा गंभीर आरोप, भाजपवरही टीका...
14
"लोकशाहीची चिंता करू नका, उबाठा गटच अखेरचा श्वास घेतोय"; राऊतांना भाजपचं सणसणीत प्रत्युत्तर
15
भीषण पाणीटंचाई! तहान भागवण्यासाठी जीवघेणा प्रवास, कडाक्याच्या उन्हात रोज ३ किमीची पायपीट
16
Gold Silver Rate Today: सोनं २७०० रुपयांनी तर चांदी १०९०० रुपयांपेक्षा अधिकनं महागलं; पटापट चेक कर आजचा लेटेस्ट रेट
17
पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री ठरला? अमित शाह यांच्या दोन संकेतांनी सगळंच स्पष्ट केलं!
18
स्वप्न शास्त्र: श्रीमंत व्हायचंय? मग स्वप्नात दिसलेल्या 'या' गोष्टी कोणालाही सांगू नका 
19
पहिल्याच दिवशी २०० रुपयांच्या पार पोहोचला 'हा' शेअर; घसरत्या बाजारातही धमाकेदार एन्ट्री, कोणता आहे स्टॉक?
20
Lord Shiva Temple Demolished: तेलंगणामध्ये शाळेसाठी ८०० वर्षे जुने शिवमंदिर पाडलं, नागरिकांमध्ये संतापाची लाट!
Daily Top 2Weekly Top 5

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणूक मार्गाचे रुंदीकरण ७५ कोटी रुपयांची आणखी गरज

By admin | Updated: December 28, 2014 01:03 IST

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणूक मार्गाचे रुंदीकरण ७५ कोटी रुपयांची आणखी गरज

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या शाही मिरवणूक मार्गाचे रुंदीकरण करण्याची महापालिकेने तयारी करून, त्यासाठी जागा संपादित करण्याबाबत सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित धरला असला तरी, प्रत्यक्षात जागेचा मोबदला व त्या जागेवर असलेल्या कच्च्या-पक्क्या स्वरूपाच्या बांधकामाची नुकसानभरपाई देण्यासाठी जवळपास ७५ कोटी रुपयांची आणखी गरज भासणार असल्याने महापालिकेची सद्याची आर्थिक परिस्थिती पाहता शाहीमार्गाचे रुंदीकरण कागदावरच ठरण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे भूसंपादन अधिकाऱ्यांनी भूसंपादन कायद्याच्या कलम ९ अन्वये सर्व जागामालकांना नोटीस बजावून त्यांना म्हणणे मांडण्याची अंतिम संधी दिली आहे. मात्र या नोटिशीच्या आधारे कोणत्याही परिस्थितीत रुंदीकरणासाठी जागा संपादित केली जाईल असा त्या नोटिशीचा अर्थ आहे, तर शाहीमार्गाच्या रुंदीकरणाऐवजी पर्यायी मार्गाने मिरवणूक काढण्यासाठी साधु-महंतांचे मन वळविण्याची तयारी प्रशासनाने दर्शविल्यामुळे एकूणच रुंदीकरणाचा गुंता दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. रमणी आयोगाच्या शिफारशीनुसार शाहीमार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव तयार करून त्यादृष्टीने महापालिकेने तयारी चालविली असून, जिल्हाधिकाऱ्यांकरवी शाहीमार्गाच्या रुंदीकरणासाठी जागा संपादित करण्यासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मिरवणूक मार्गाच्या जाण्याच्या व परतीच्या मार्गाचे मिळून सुमारे ६५८० चौरस मीटर जागेच्या संपादनासाठी २५ कोटी रुपये आर्थिक तरतूद धरण्यात आली आहे. त्यापैकी महापालिकेने दोन कोटी रुपये भूसंपादन अधिकाऱ्याकडे जमा केले असून, उर्वरित निधीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर येऊन ठेपल्याने शाहीमार्गाच्या रुंदीकरणाच्या व त्या अनुषंगाने भूसंपादनाच्या तयारीला वेग देऊन भूसंपादन अधिकाऱ्यांनी निवाडा जाहीर करून कलम ९ची नोटीसही बजावली आहे. या नोटिसीचा अर्थ म्हणजे शासनाने सदर जागा संपादित करण्याचा अंतिम निर्णय घेतला असून, त्यात कोणताही बदल होणार नाही. या उपरही जागामालकांना त्यांचे काही म्हणणे मांडायचे असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात ३१ डिसेंबरपर्यंत ते सादर करण्याची मुदत देण्यात आली आहे. एकीकडे भूसंपादनाची तयारी अंतिम टप्प्यात आलेली असताना जागामालकांना मोबदला देऊन जागा ताब्यात घेण्याबाबत महापालिकेचे आस्तेकदम सुरू झाले आहे.
निधीची तरतूदच होत नसल्याने भूसंपादनालाही खीळ बसली असूून, जागा ताब्यात घेण्यासाठी २५ कोटी व त्या जागेवर सद्य:स्थितीत जे काही बांधकाम आहे ते तोडल्याची भरपाई म्हणून सुमारे ७५ कोटींची गरज लागणार आहे. महापालिकेची त्याला तयारी नाही. उलट शाही मिरवणुकीसाठी पर्यायी मार्गाचा विचार पुढे येऊन त्याला प्रशासन व स्थानिक साधु-महंतांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळू लागल्याने जवळपास शंभर कोटी रुपये खर्च करून जुन्या शाहीमार्गाच्या रुंदीकरणास महापालिका मुरड घालण्याच्या तयारीत आहे. जुन्या मार्गाच्या रुंदीकरणाबाबत जागामालकांचे एकूणच मत व त्याला विरोध झाल्यास हीच बाब पुढे करून महापालिका रुंदीकरणाविषयी आपली मान सोडवून घेण्याच्या मन:स्थितीत आहे. (प्रतिनिधी)