शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

कुठे निधी विक्री, तर कुठे ‘घरवापसी’

By admin | Updated: July 21, 2016 01:07 IST

सदस्यांची निधी खर्चाची अशीही ‘भाऊगर्दी

 ’नाशिक : येत्या आॅगस्ट अखेरला आचारसंहिता लागण्याची चिन्हे दिसू लागल्याने जिल्हा परिषद सदस्यांचा सेस निधी खर्चासाठी आटापिटा सुरू झाला आहे. काही तालुक्यांतून सदस्यांनी अन्य तालुक्यात निधी ‘विक्री’ केल्याची चर्चा आहे. तर काही ठिकाणी हा विक्री केलेला निधी परत आणण्याचे पत्र देण्यासाठी सदस्यांची लगीनघाई सुरू झाल्याचे चित्र आहे.जिल्हा परिषदेत याआधीही मागील वर्षी चांदवड, नाशिक व सिन्नर तालुक्यातील सदस्यांनी त्यांच्या सेसचा निधी इगतपुरी तालुक्यात विक्री केल्याची ओरड झाल्यानंतर काही सदस्यांनी आपला निधी आपल्याच गटात माघारी फिरविला होता. आता कार्यकाळ संपत आल्याने पुन्हा निवडून येऊ किंवा नाही, गटाचे आरक्षण सोयीने होणार की नाही, या सर्व चिंता विद्यमान सदस्यांना सतावू लागल्या असून, त्यातूनच हा निधी विक्रीचा फंडा समोर आल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. आॅगस्ट अखेरीस पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची चर्चा सुरू होताच जिल्हा परिषदेत सदस्यांनी गर्दी केली असून, काही सदस्यांनी त्यांच्या वाटेला आलेला १८ लाखांचा निधी त्यांच्याच गटात खर्च करण्यासाठी अध्यक्षांच्या नावे पत्र दिले आहे. तर काही सदस्यांनी त्यांच्या गटाचा निधी अन्यत्र खर्च करण्यास संमती दिल्याचे पत्र अध्यक्षांकडे दिल्याचे समजते. सिन्नर तालुक्यातील दोघा सदस्यांनी त्यांचा निधी बागलाण तालुक्यात दिल्याची चर्चा असून, या सदस्यांना निवडून आणण्यासाठी ‘परिश्रम’ घेणाऱ्या शिवसेनेच्या एका नेत्याने हा निधी पुन्हा सिन्नर तालुक्यातच खर्च करण्याबाबत या दोन्ही सदस्यांचे मन वळविण्याचे प्रयत्न केल्याचे बुधवारी चित्र होते. निफाड तालुक्यातीलही एका सदस्याने त्यांच्या गटातील निधी इगतपुरीत ‘खर्च’ करण्यास संमती दिल्याची चर्चा आहे.