वसाकाची चाके फिरणार कधी?

By Admin | Updated: September 30, 2014 21:59 IST2014-09-30T21:55:17+5:302014-09-30T21:59:03+5:30

वसाकाची चाके फिरणार कधी?

When will wheels turn? | वसाकाची चाके फिरणार कधी?

वसाकाची चाके फिरणार कधी?

भऊर : कसमादे परिसरातील वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखाना ( वसाका) अखेरच्या घटका मोजत असून, चालू गळीत हंगामात वसाकाची चाके पुन्हा फिरावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
वसाकाची आजची परिस्थिती कुणामुळे निर्माण झाली? वसाका कार्यक्षेत्रातील सर्व राजकारण्यांनी, कामगारांनी, नेत्यांनी, संचालक मंडळातील प्रतिनिधींनी आपापसातील हेवे-दावे संपवून एकदिलाने फक्त वसाका वाचवण्यासाठी एकत्र येऊन आगामी गळीत हंगाम कुठल्याही परिस्थितीत चालू करण्यासाठी प्रयत्नशील होणे गरजेचे झाले आहे.
अलीकडच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वसाका कार्यस्थळावरील हालचालीवरून दिसून येत होते. वसाका सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. हंगाम सुरू व्हावा यासाठी ठिकठिकाणी बैठका घेतल्या जात होत्या. वसाका बचाव कृती समितीचीही स्थापना करण्यात आली आहे. यात या सर्वांना यश लाभून वसाकाची परिस्थिती पूर्वपदावर यावी ही सर्व सभासद, कामगारांची इच्छा आहे.
शासन स्तरावरून शेतकऱ्यांच्या विकासासाठी कल्याणकारी विविध अनुदानी योजनांची घोषणा करीत असताना जो वसाका कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचा आहे. शेतकरी त्या उद्योगाचे खरेखुरे मालक आहेत. त्याच कारखान्यावर दुसऱ्या बाजूला थकीत कर्जापोटी संबंधित बँकेकडून जप्तीची नोटीस दिली जाते ही बाब वसाकाच्या कामगार, सभासद व परिसरातील शेतकरी वर्गावर अन्यायकारक ठरावी. एकंदरीत वसाका कुठल्याही परिस्थितीत चालू व्हावा यासाठी परिसरातील सर्वांनी प्रयत्न करावा, अशी अपेक्षा सर्व स्तरावरुन व्यक्त होत आहे.(वार्ताहर)

Web Title: When will wheels turn?