When will the household get funding? | घरकुलाचा निधी मिळणार कधी?

घरकुलाचा निधी मिळणार कधी?

देवगाव : त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये पंतप्रधान घरकुल योजना व रमाई घरकुल आवास योजनेचा निधी संपल्यामुळे ऐन पावसाळा
जवळ आला असताना अर्धवट स्थितीतील हक्काचा निवारा कधी पूर्ण होणार याच्या प्रतीक्षेत लाभार्थी आहेत.
प्रत्येकाला हक्काचे घरकुल देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. मात्र, या हक्काच्या घरकुलांना निधीचा ब्रेक लागला आहे. योजनेच्या खात्यावर पैसेच नसल्याने लाभार्थ्यांची मोठी अडचण
निर्माण झाली आहे. अनुदानाअभवी कामाच्या ऐन घाईत घरांचे बांधकाम बंद ठेवण्याची वेळ त्यांच्यावर
आली आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना पैशासाठी हेलपाटे मारावे लागत आहेत.
रमाई आवास घरकुल लाभार्थ्यांना पिहल्या हप्त्यात घरकुलाच्या पायाचे बांधकाम करून ठेवले आहे. मात्र, दोन मिहने उलटूनही लाभार्थ्यांना घरकुलाचा दुसरा
हप्ता मिळत नसल्याने तालुक्यातील घरकुल लाभार्थी अडचणीत
सापडले आहेत. दुसर्याच हप्त्याला एवढा वेळ तर तिसरा, चौथा कधी मिळणार आणि घरकुल पूर्ण कधी होणार? या चिंतेत लाभार्थी सापडले आहेत.
खात्यावर अनुदानाची रक्कम जमा न झाल्याने पंचायत समितीचे हेलपाटे मारावे लागत आहेत. घरकुल योजनेचा निधी तातडीने उपलब्ध करण्याची मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे.
------------------------------------------------------
शासनाकडून गरीब आणि कुडामातीच्या घरात राहणार्या लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल व रमाई आवास घरकुल योजनेमधून घरकुल दिले जाते. मात्र, घरकुलाचा हप्ता वेळेवर मिळत नसल्याने काम पूर्ण कसे करावे असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुळात हा काळ बांधकाम पूर्ण करण्याचा असतो. काही दिवसानंतर पावसाचा धोका असल्याने लवकर बांधकाम पूर्ण करण्याकडे लाभार्थ्यांचा कल असतो. मात्र, योजनेच्या खात्यावर पैसेच उपलब्ध नसल्याने लाभार्थ्यांना पैसे मिळेना झाले आहेत.

 

Web Title:  When will the household get funding?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.