शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
2
KKR चे 'वैभव'! असा भारी चेंडू टाकला की फलंदाजाला चकवून फक्त १ बेल्स उडवून गेला, Video 
3
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
4
अमित शहांच्या 'त्या' फेक व्हिडिओवर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया; काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल...
5
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
6
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
7
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
8
निलेश लंकेंना मोठा दिलासा; अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक नाट्यमय घडामोडी!
9
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
10
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
11
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
12
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
13
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
14
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
15
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
16
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
17
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
18
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
19
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
20
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 

पाकिस्तानच्या भुत्तो कुटुंबियांचा इतिहास जागविते नाशिकमधील पुरातन बारव

By azhar.sheikh | Published: May 14, 2018 4:53 PM

नाशिक शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव फाट्यावरुन तीन किलोमीटरवर आतमध्ये इंदोरे हे लहानसे गाव आहे.

ठळक मुद्देझुल्फिकार भुत्तो यांचे वडील शाहनवाज भुत्तो हे गुजरात्या जुनागड संस्थानाचे दिवाण दुष्काळ पडला तेव्हा या बारवमध्ये पाण्याची पातळी चांगल्याप्रकारे टिकून होतीइंदोरे गावात आजही भुत्तो खानदानाची दफनभूमी (कब्रस्तान) नजरेस पडतेइंदोरे या लहानशा गावी भुत्तो यांच्या जमिनी होत्या

नाशिक : पाकिस्तानचे माजी राष्ट्रप्रमुख व दिवंगत पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांचे वडील झुल्फिकार अली भुत्तो यांचा थेट संबंध नाशिकशी फाळणीपुर्व आल्याच्या खाणाखुणा आहे. उच्चशिक्षित झुल्फिकार हे इंग्रज लष्करामध्ये नोकरीला होते. त्यावेळी ते नाशिकमध्ये देवळाली कॅम्पच्या लष्करी छावणीत वास्तव्यास असल्याचे बोलले जाते. नाशिकमधील दिंडोरी तालुक्यातील इंदोरे या लहानशा गावी भुत्तो यांच्या जमिनी होत्या. या गावाच्या मातीमध्ये भुत्तो कुटुंबियांचा इतिहास दडलेला आहे. गावातील जुनी बारव जी भुत्तो यांनी फाळणीच्या वेळी गावाला बक्षीस म्हणून दिली ती बारव इतिहास जागविते. गावातील ९६ वर्षीय खंडेराव दरगोडे या ज्येष्ठांनाही त्यावेळीच्या आठवणी आजही लख्ख आठवतात.

नाशिक शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळेगाव फाट्यावरुन तीन किलोमीटरवर आतमध्ये इंदोरे हे लहानसे गाव आहे. झुल्फिकार भुत्तो यांचे वडील शाहनवाज भुत्तो हे गुजरात्या जुनागड संस्थानाचे दिवाण होते. त्यावेळी त्यांच्याकडे परंपरागत नाशिक भागातील काही जहागिऱ्या होत्या. इंदोरे गावातही त्यांची दहा ते पंधरा एकर जमीन होती, ती त्यांनी कुळांना कसण्यासाठी दिल्याचे आजही दरगोडे हे आत्मविश्वासाने सांगतात.

इंदोरे गावातील मुख्य रस्त्याच्या कडेला आजही भुत्तो खानदानाची दफनभूमी (कब्रस्तान) नजरेस पडते. या दफनभूमीमधील काही दगडी कबरी झाडाझुडुपांमध्ये असल्याने लक्षात येत नाही. हे कब्रस्तान भुत्तो यांच्या खानदानाचे होते, असे दरगोडे व मोहम्मद हनिफ सय्यद यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. भुत्तो यांनी शेतसारा गोळा करण्यासाठी रानडे नावाच्या वकिलांची नियुक्ती त्याकाळात केली होती हेदेखील दरगोडे यांना चांगले आठवते. रानडे वकिलांशी त्यांचा चांगला परिचय त्यावेळी आला.

https://youtu.be/xh-M0HKywt4

बारव दिली गावाला भेटभारताच्या फाळणीनंतर भुत्तो हे पाकिस्तानात निघून गेले त्यावेळी त्यांनी त्यांच्या इंदोरे गावामधील कुळाच्या जमिनींना लागून असलेली मोठी जुनी बारव गावाला बक्षीस म्हणून दिली. या बारववर कोणाचाही  हक्क नसून ती गावाची जुनी बारव म्हणून आजही ओळखली जाते. या बारवमुळे या गावाचे गावपण टिकून राहिले असे दरगोडे सांगतात. कारण दुष्काळ पडला तेव्हा या बारवमध्ये पाण्याची पातळी चांगल्याप्रकारे टिकून होती. यामुळे गावातील जेमतेम अडीचशे ते पाचशे लोकांची तहान या विहिरीने त्यावेळी भागविली. गावक-यांचे पशुधनही या विहिरीवर आपली तहान भागवत आंघोळ करत असे बारवमध्ये उत्तरण्यासाठी पाय-यांचा जीना ही बांधलेला होता. कालंतराने गावक-यांनी बारवमध्ये जाण्याची ही वाट बुझविल्याचे दरगोडे म्हणाले. त्यानंतर परिस्थिती बदलली गाव बागायती झाले. आजही बारवच्या तळाला पाण्याची पातळी टिकून आहे. जर त्यावेळी ही बारव इंदोरेवासियांना मिळाली नसती तर कदाचित मोठ्या प्रमाणात लोकांचे स्थलांतर झाले असते, असे दरगोडे म्हणाले.

गावातील ९६ वर्षीय खंडेराव दरगोडे

टॅग्स :NashikनाशिकPakistanपाकिस्तानBenazir Bhuttoबेनझीर भुत्तो