विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावेविवेक वेलणकर

By Admin | Updated: July 28, 2014 00:46 IST2014-07-27T23:46:31+5:302014-07-28T00:46:32+5:30

: नाशिक एज्युकेशन सोसायटी विद्यार्थी गुणगौरव सोहळा

Weling students should have a career in the field of interest | विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावेविवेक वेलणकर

विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्रात करिअर करावेविवेक वेलणकर

नाशिक : विद्यार्थ्यांनी शालांत परीक्षेनंतर आपली क्षमता, कुवत व आवडीच्या क्षेत्राची निवड करावी. त्यामुळे आपण निश्चित केलेल्या ध्येयापावेतो सहज पोहोचू शकतो व उत्तम यश संपादन करू शकतो, असे प्रतिपादन समुपदेशक विवेक वेलणकर यांनी केले.
नाशिक एज्युकेशन सोसायटीच्यावतीने प. सा. नाट्यगृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमप्रसंगी वेलणकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर होते. याप्रसंगी उपाध्यक्ष प्रा. दिलीप फडके, रमेश देशमुख, शिक्षक मंडळ अध्यक्ष राजेंद्र निकम, उपाध्यक्ष रत्नप्रभा सूर्यवंशी, कार्यवाह शशांक मदाने, कार्यकारी मंडळ सदस्य पां. म. अकोलकर, डी. एस. कुलकर्णी, चंद्रशेखर मोंढे, यशवंत जोशी, वि. भा. देशपांडे, श्रीरंग वैशंपायन उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक संस्थेचे कार्यवाह शशांक मदाने यांनी केले. पाहुण्यांचा परिचय चंद्रशेखर मोंढे यांनी करून दिला.
पारितोषिक यादीचे वाचन आरती ठकार, सुनंदा कुलकर्णी, उमेश कुलकर्णी, पूनम कुमावत, श्वेता देशपांडे यांनी केले. सूत्रसंचालन सहकार्यवाह दिलीप अहिरे व मनीषा देशपांडे यांनी केले. राजेंद्र निकम यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Weling students should have a career in the field of interest