शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

नायगाव येथे आठवडे बाजाराला सुरुवात

By admin | Updated: September 26, 2016 23:20 IST

उत्साह : ४० वर्षांनंतर ग्रामस्थांनी केली खरेदीसाठी गर्दी

दत्ता दिघोळे ल्ल नायगावबटाटे वीस रुपये.. मिरची दहा रुपये.. भेंडी पंधरा रुपये.. कोणताही माल दहा रुपये.. आलेल्या दुकानदारांचे स्वागत.. ग्राहकांचे अभिनंदन.. या आणि अशा अनेक सुरांच्या आवाजाने उजाडला नायगावकरांचा शनिवार. निमित्त होते तब्बल ४० वर्षांनंतर सुरू झालेल्या आठवडे बाजाराच्या शुभारंभाचे !गेल्या महिनाभरापासून नायगाव व परिसरातील ग्रामस्थांना आठवडे बाजार सुरू होणाऱ्या शनिवारची उत्सुकता होती. ग्रामपंचायत प्रशासनाला दुकानांची गर्दी व ग्राहकांचा प्रतिसाद मिळेल काय याची उत्सकता होती. शनिवारी आठवडे बाजार भरला आणि विविध भागातून आलेल्या दुकानदारांनी व गाव परिसरातील ग्राहकांनी या आठवडे बाजाराला दिलेला प्रतिसाद पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून लागला. सकाळी ७ वाजेपासूनच बसस्थानक परिसरात एक एक करत अवघ्या तास-दीड तासात संपूर्ण परिसर विविध भाजीपाला, खाऊ, स्टोव्ह दुरुस्ती, कृषिपंप-गॅस शेगडी दुरुस्ती, खारी टोस्ट अशा विविध दुकानांनी संपूर्ण परिसर ग्राहकांच्या प्रतिसादाने गर्दीने फुलून गेला होता.गेल्या अनेक वर्षांच्या विश्रांतीनंतर नायगाव आठवडे बाजाराने फुलून गेला होता. गाव व परिसरातील नागरिकांनी याठिकाणी खरेदीसाठी व आठवडे बाजार बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी सरपंच इंदुमती कातकाडे, उपसरपंच अनिता जेजूरकर, सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी येणाऱ्या दुकानदारांना जागेची व्यवस्था करून देताना दिसत होते. पहिल्याच बाजारास दुकानदार व ग्राहकांचा प्रतिसाद बघता हा बाजार येत्या काही दिवसांत चांगलाच फुलेल, असा अंदाज आहे. यावेळी जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बर्डे, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, बाळासाहेब केदार, दिलीप पवार, लक्ष्मण भास्कर, धनलक्ष्मीचे चिंधू डोमाडे, बाळू कापडी आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. परिसरातील नायगाव, जायगाव, देशवंडी, वडझिरे, ब्राह्मणवाडे, मोह, मोहदरी, जाखोरी, सोनगिरी, जोगलटेंभी, निफाड तालुक्यातील पिंपळगाव, सावळी, तळवाडे, महाजनपूर आदि गावांच्या लोकांना नायगाव हे इतर आठवडे बाजारासाठी जवळचे ठिकाण असल्याने या आठवडे बाजाराला प्रत्येक शनिवारी चांगला प्रतिसाद लाभेल, असा अंदाज आहे. परिसरात नायगावच्या आठवडे बाजाराचीच चर्चा रंगली आहे. स्थानिक ग्रामस्थ व व्यापाऱ्यांकडून खरेदीशुभारंभाचा बाजार असल्याने बाहेरून आलेल्या दुकानदारांची खरेदी-विक्री झाली पाहिजे या उद्देशाने स्थानिक ग्रामस्थांनी व्यापाऱ्यांकडे विविध मालाची खरेदी केली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रोशन गायकवाड हे ध्वनिक्षेपकावरून दुकानदारांना सहकार्य करण्याचे आवाहन करत होते. नायगाव परिसर तसा शेतीवरच अवलंबून आहे. भाजीपाला मोठ्या प्रमाणात पिकत असला तरी बाजार सुरू राहण्यासाठी आज अनेक शेतकऱ्यांनी गरज नसतानाही भाजीपाला खरेदी केली, तर अनेकांनी खाऊच्या दुकानात भारतीय बैठक मारत गरमागरम जिलेबी व भेळ खाण्याचा आनंद लुटला.