शहरं
Join us  
Trending Stories
1
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी
2
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
3
कांद्यावरून पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारणाऱ्या तरुणाचा मला अभिमान, शरद पवारांचं मोठं विधान
4
पंतप्रधान मोदींच्या जाहीर सभेसाठी मुंबईच्या वाहतुकीत १४ तासांसाठी बदल; 'या' मार्गांवर पर्यायी व्यवस्था
5
विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!
6
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
7
शुक्रादित्य राजयोग: ८ राशींना लाभच लाभ, वरदान काळ; सुख-समृद्धी प्राप्ती, पद-प्रतिष्ठा वाढेल!
8
Kanhaiya Kumar : "गेल्या 10 वर्षांत पंतप्रधानांनी काय केलं?"; कन्हैया कुमार यांचा मनोज तिवारींना खोचक सवाल
9
'गर्व' मधली सलमानची बहीण आठवतेय? २० वर्षांनंतर करणार कमबॅक; रणबीर कपूरशी आहे कनेक्शन
10
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
11
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
12
Energy Mission Machineries IPO: ₹१३८ वर आलेला IPO, लिस्टिंगच्या दिवशीच १६५%ची वाढ; ₹३६६ वर गेला 'हा' शेअर
13
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
14
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
15
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
16
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
17
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
18
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
19
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
20
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक

वर्षासहलीने साजरा ‘वीकेण्ड’ : पर्यटनस्थळे गजबजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2018 12:58 AM

महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सरकारी कार्यालये, बॅँकांना सुटी व रविवारची साप्ताहिक सुटी असल्यामुळे नाशिककरांनी ‘वीकेण्ड’ वर्षासहलीने साजरा करणे पसंत केले. यामुळे शहराजवळील ‘वन-डे ट्रीप’ची पर्यटनस्थळे गजबजली होती.

नाशिक : महिन्याचा दुसरा शनिवार असल्याने सरकारी कार्यालये, बॅँकांना सुटी व रविवारची साप्ताहिक सुटी असल्यामुळे नाशिककरांनी ‘वीकेण्ड’ वर्षासहलीने साजरा करणे पसंत केले. यामुळे शहराजवळील ‘वन-डे ट्रीप’ची पर्यटनस्थळे गजबजली होती.  शनिवारी संध्याकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने नाशिककरांनी वीकेण्डला पावसाळी पर्यटनाचा बेत आखला होता. काही नागरिक शनिवारीच पर्यटनासाठी बाहेर पडले तर काहींनी रविवारच्या सुटीची धमाल केली. दरम्यान, शहराजवळची पर्यटनस्थळे पर्यटकांनी फुलली होती. नाशिककरांच्या आवडीचे डेस्टिनेशन असलेले सोमेश्वरजवळील दूधसागर धबधब्यावर नागरिकांची जणू जत्रा भरल्याचे चित्र होते; कारण या हंगामात प्रथमच दूधसागर धबधबा रविवारी सकाळपासून खळाळत होता. दुपारनंतर पावसाचा जोर ओसरल्याने धबधब्याचे पाणीही कमी झाले होते. सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत दूधसागर धबधब्याच्या परिसरात नागरिकांची गर्दी दिसून आली.  तसेच त्र्यंबकेश्वर, हरसूल-वाघेरा घाटमार्ग, पहिने-पेगलवाडी रस्ता, इगतपुरीजवळील भावली धरण परिसर, अशोका धबधबा, नांदूरमधमेश्वर या भागात पर्यटकांची गर्दी दिसून आली. भावलीच्या गायवझरा, सुपवझरा धबधब्यासह नागरिकांनी अशोका धबधब्याजवळही पावसाळी पर्यटनाचा आनंद लुटला. इगतपुरी- घोटी पोलीस ठाण्यांच्या वतीने पर्यटनस्थळांभोवती चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. रविवारी दिवसभर त्र्यंबकेश्वर, इगतपुरी तालुक्यांमध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने पर्यटनासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा उत्साह अधिकच द्विगुणित झाला होता. पर्यटकांची त्र्यंबकेश्वरसह भावली परिसरात एकच गर्दी लोटल्यामुळे वाहतूक कोंडीचे चित्र पहावयास मिळाले. पर्यटकांची वाहने आणि प्रवासी वाहतूक यामुळे पर्यटनस्थळांभोवती रस्त्यांवर वाहनांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. यामुळे त्र्यंबक -घोटी मार्गासह पहिने-पेगलवाडी शिवारातही वाहनकोंडी झाली होती.भावली-भंडारदरा सहलवीकेण्डच्या निमित्ताने पावसाळी सहलीसाठी बहुतांश नागरिकांनी भावली-भंडारदरा असा वन-डे ट्रीपचा बेत आखून पावसाच्या सरींमध्ये ओलेचिंब होत या भागातील धबधब्यांजवळ मनमुरादपणे पर्यटनाचा आनंद लुटला. भावली गावापासून भंडारदराकडे जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्यामुळे अनेकांनी मधल्या रस्त्याचा पर्याय निवडत भंडारदरा गाठले. गर्द हिरवाईने नटलेल्या भंडारदरा भागातील धबधब्यांनी नागरिकांची मने जिंकली.

टॅग्स :tourismपर्यटन