शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

कोळगावमाळ येथे सरपंचांकडून गावाला टॅँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2019 17:10 IST

पाथरे : सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे सरपंच ललिता कुमावत आणि ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती (बंडोपंत) कुमावत यांनी स्वखर्चाने गावाला टॅँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.

पाथरे : सिन्नर तालुक्यातील कोळगावमाळ येथे सरपंच ललिता कुमावत आणि ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती (बंडोपंत) कुमावत यांनी स्वखर्चाने गावाला टॅँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे.सद्या सगळीकडे तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. मात्र कोळगावमाळ गावास पाणी टंचाईचा सामना अद्याप पर्यंत करावा लागला नव्हता. कारण गावाजवळून नांदूर-मध्यमेश्वरचा उजवा कालवा जातो. कालव्याला येणाऱ्या पाण्याच्या आवर्तनामुळे कोळगावास मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होत असे. परंतु यावर्षी उन्हाळ्यात गावात तीव्र पाणी समस्या निर्माण झाली आहे. त्यातच पुरेशा वीजपुरवठा अभावी कोळगावमाळ येथे निर्माण झालेल्या कृत्रिम पाणीटंचाईवर मात करण्यासाठी सरपंच सौ. ललिता कुमावत पुढे सरसावल्या असून त्यांनी पती निवृत्ती कुमावत यांच्या मदतीने गावाला मोफत पाणीपुरवठा सुरू केला आहे. परिसरात दिवसभरात फक्त दोन तास थ्री फेज वीज पुरवठा केला जातो त्यामुळे पाण्याची टाकी भरत नाही परिणामी गावात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे. तसेच प्राणी, पशु, माणसे यांना पाण्याची तीव्र गरज भासू लागली आहे. हे चित्र येथील ग्रामपंचायत सरपंच ललिता कुमावत आणि त्यांचे पती सदस्य निवृत्ती कुमावत यांच्या लक्षात आले. तालुका प्रशासन गावास पाणीपुरवठा करेल या विचारात बसण्यापेक्षा त्यांनी स्वत: स्वखर्चाने गावास पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. सरपंच म्हणून आपली जबाबदारी आहे की गावाला मुबलक प्रमाणात पाणी पुरवठा करणे आणि त्याअनुषंगाने कुमावत कुटूंबाने स्वखर्चाने ही जबाबदारी स्वीकारली आहे. दिवसभरात टँकरने दोन ते तीन खेपा करून गावाची तहान भागवण्याचे काम कुमावत करत आहे. एका टँकरच्या फेरीसाठी साधारण एक ते दीडहजार रूपये इतका खर्च लागत आहे. गावातील महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी मी व माझ्या कुटूंबाने हा उपक्रम हाती घेतला असल्याचे कुमावत यांनी सांगितले.

टॅग्स :Waterपाणी