शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

सिडको विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत

By admin | Updated: November 1, 2014 23:59 IST

महिलांची भटकंती : विभागप्रमुख अनभिज्ञ

सिडको : गेल्या काही दिवसांपासून सिडको विभागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला असून, महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. पाणीपुरवठा ही महत्त्वाची व अत्यावश्यक बाब असतानाही संबंधित विभागाचे प्रमुख मात्र कार्यालयात न बसता साईट व्हिजिट करण्यातच धन्यता मानत आहेत. गेल्या काही दिवसांपासून कमी दाबाने व अवेळी होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे महिलावर्गात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, पाणीपुरवठ्याचा प्रश्न गंभीर बनलेला असतानाही संबंधित विभागाचे उपअभियंता संजय बच्छाव मात्र याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप केला जात आहे. पाणीपुरवठ्याबाबत तक्रारी करण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना बच्छाव यांची भेटच मिळत नसून साहेब व्हिजिटला गेले आहेत असेच कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येते. मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार नागरिकांच्या तक्रारींचे निरसन तसेच विविध कामकाजासाठी दुपारी तीन वाजेपासून अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसणे बंधनकारक असतानाही बच्छाव मात्र कार्यालयात हजर राहत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. (वार्ताहर)