शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
4
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
5
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
6
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
7
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
8
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
9
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
10
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
11
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
12
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
13
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
20
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
Daily Top 2Weekly Top 5

वाड्या-वस्त्यांवर पाणीटंचाईच्या झळा

By admin | Updated: March 2, 2016 23:08 IST

नांदूरशिंगोटे : टॅँकरच्या फेऱ्या सुरू करण्याची मागणी

नांदूरशिंगोटे : येथील एकलव्यनगरातील (ठाकरवाडी) सार्वजनिक विहिरीने तळ गाठल्याने टॅँकरने पाणीपुरवठा करण्याची मागणी आदिवासी बांधवांनी निवेदनाद्वारे केली आहे. वाड्या-वस्त्यांवर टॅँकर सुरू करण्यासंदर्भात ग्रामपंचायतीने तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. पाच वर्षांपासून परिसरात पावसाचे प्रमाण कमी असल्याने वाड्या-वस्त्यांवर तीव्र पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीस टंचाई जाणवू लागल्याने जून महिन्यापर्यंत पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. वाड्या-वस्त्यांवरील विहिरींनी तळ गाठला आहे. इतर पाण्याचा स्त्रोत उपलब्ध नसल्याने पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. एकलव्यनगर (ठाकरवाडी) भागातील लोकसंख्या सुमारे पाचशे असून, दीडशेच्या आसपास कुटुंबे आहेत. सहा वर्षांपूर्वी येथील वाडी-वस्त्यांसाठी नळपाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. येथील पाणीपुरवठा करण्यासाठी सार्वजनिक विहीर आहे. परंतु, दरवर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीस विहीर तळ गाठण्यास सुरुवात होत असल्याने असल्याने पाणीटंचाई भासू लागते. पाच वर्षांपासून पावसाचे प्रमाण कमी असल्याने नद्या-नाले, विहिरी, बंधारे, पाझर तलाव, केटिवेअर कोरडेठाक पडत आहेत. इतर जलस्रोत उपलब्ध नसल्याने आदिवासी महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. तसेच जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने त्याचा परिणाम शेती व दुग्ध व्यवसायावर झाला आहे. कणकोरीसह पाच गाव प्रादेशिक नळपाणीपुरवठा योजनेत नांदूरशिंगोटे व काही वाड्या-वस्त्यांचा समावेश आहे. परंतु, ज्या वाड्या-वस्त्यांचा समावेश नाही तेथे तीव्र पाणीटंचाई भासू लागली आहे. प्रशासनाने वाड्या-वस्त्यांवर त्वरित टॅँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचे निवेदन ग्रामपंचायत, तलाठी, पंचायत समिती, तहसील कार्यालय यांना पाठविण्यात आले आहे. निवेदनावर ग्रामपंचायत सदस्य वाळिबा मेंगाळ, त्र्यंबक मेंगाळ, धनलाल मेंगाळ, पंढरीनाथ मेंगाळ, हौशीराम मेंगाळ, रामचंद्र मेंगाळ, रखमा मेंगाळ, गंगाराम मेंगाळ, सोमनाथ आगिवले, उमा पथवे, महादू मेंगाळ, पार्वता शेळके, पार्वता मेंगाळ, हिराबाई मेंगाळ आदिंसह आदिवासी बांधवांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)