शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

बरड्याची वाडीचा पाणीप्रश्न अखेर सुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:27 IST

वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद‌्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यालाही अखेर यश आले.

ठळक मुद्देवैतरणानगर : श्रमजीवी संघटनेच्या लढ्याला अखेर आले यश

वैतरणानगर : गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारा बरड्याचीवाडी, ता. त्र्यंबकेश्वर येथील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अखेर सुटला असून, या नळ पाणीपुरवठा योजनेचे उद‌्घाटन सोमवारी (दि.२५) करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या लढ्यालाही अखेर यश आले.त्र्यंबकेश्वर तालुक्यातील बरड्याची वाडी येथील पाणीटंचाईबाबत गेल्या ३ वर्षांपासून श्रमजीवी संघटनेने सतत आंदोलने, मोर्चे, निवेदन देऊन पाणीप्रश्न सुटावा यासाठी प्रयत्न केले होते. प्रसारमाध्यमांनीदेखील या गावचा ग्राऊंड रिपोर्ट घेत बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या. लोकसभेच्या निवडणूक काळात राज ठाकरे यांनी लाव रे तो व्हिडिओ म्हणून याच वाडीचा पाणीटंचाईचा व्हिडीओ नाशिकच्या जाहीर सभेत दाखवला होता.याबाबत श्रमजीवी संघटनेने जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले. त्यानंतर याबाबतीत आमदार हिरामण खोसकर यांची शिष्टमंडळाने भेट घेऊन पाणीप्रश्न सोडवावा म्हणून मागणी केली होती. त्यांनी तत्काळ या योजनेसाठी त्यांच्या विकास निधीमधून १५ लाख रुपये दिले आणि सोमवारी खोसकर यांच्याच हस्ते योजनेचे उद्घाटन करण्यात आले. श्रमजीवी संघटनेच्या लढ्याला मिळालेले यश असल्याचे संघटनेचे तालुकाध्यक्ष भगवान डोखे यांनी सांगितले.आमदार स्थानिक विकास निधीमधून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १५ लाख, तर डोंगरी विकास निधीमधून ९ लाख ४० हजार रुपये अंगणवाडी इमारतीसाठी दिले असून, या योजनेचे तत्काळ काम सुरू होणार असल्याची माहिती यावेळी आमदार खोसकर यांनी दिली.यावेळी श्रमजीवी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस भगवान मधे, गटविकास अधिकारी किरण जाधव, तानाजी शिद, वसंत इरते, वावीहर्षचे सरपंच बाबूराव बांगारे, ग्रामसेवक राठोड, मांगटे, संतोष निरगुडे, शिवाजी दराने, नवसू गारे, संजय पारधी, लीला पारधी, शंकर पारधी, गेणू पादिर, चिमाबाई शिद, सुरेश बांगारे, नामदेव बांगरे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.बरड्याची वाडी येथील पाणीटंचाईचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या वेळेस गाजला होता. यावेळी अनेक पक्षांनीदेखील या विषयाकडे गांभीर्याने घेण्याचे सुचवले होते आणि सोमवारी त्याचे उदघाटन झाल्याने खऱ्या अर्थाने महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरणार आहे.भगवान मधे, जिल्हा सरचिटणीस, श्रमजीवी संघटना 

टॅग्स :water shortageपाणीकपातGovernmentसरकार