शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या भागातून पाण्याच्या तक्रारी

By admin | Updated: April 28, 2017 02:10 IST

नाशिक : पंचवटी विभागातून प्रतिनिधित्व करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि.२७) विभागातील पाणीपुरवठ्यासंबंधीचा आढावा घेतला

 नाशिक : पंचवटी विभागातून प्रतिनिधित्व करणाऱ्या महापौर रंजना भानसी यांनी गुरुवारी (दि.२७) विभागातील पाणीपुरवठ्यासंबंधीचा आढावा घेतला. यावेळी विभागातील नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याविषयी तक्रारींचा पाऊस पाडत प्रशासनाच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. दरम्यान, महापौरांनी विभागातील जुन्या पाइपलाइन बदलण्याचे निर्देश देतानाच त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले. ग्वाल्हेर येथील महापौर परिषद आणि पुणे येथील भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहून नाशकात गुरुवारी परतलेल्या महापौर रंजना भानसी यांनी तातडीने सायंकाळी पंचवटी विभागातील पाणीपुरवठा विषयक आढावा बैठक बोलाविली. या बैठकीला पंचवटी विभागातील सर्व नगरसेवकांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी नगरसेवकांनी पाणीपुरवठ्याविषयी तक्रारींचा पाऊस पाडला. पंचवटीतील कलानगर, पटेलपट्टी, कुमावतनगर, शिंदेवस्ती, दुर्गानगर आदी भागांत पाणीच पोहोचत नसल्याच्या तक्रारी सदस्यांनी केल्या. यावेळी अरुण पवार यांनी पावसाळ्यापर्यंत नवीन नळजोडणी देऊच नये, अशी भूमिका घेतली तर गुरुमित बग्गा यांनी वैयक्तिक स्तरावर नळजोडणी देण्यास विरोध दर्शविला. यावेळी महापौर रंजना भानसी यांनीही दोन जलकुंभ बांधूनही प्रभातनगर भागात पाणी पोहोचत नसल्याचे सांगत अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी अधिकाऱ्यांकडून पंचवटी विभागात एकूण २२ जलकुंभ असल्याचे सांगण्यात आले, परंतु दुर्गानगर येथील पाण्याची टाकी बांधूनही त्याचा काहीच उपयोग झाला नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्याठिकाणी तातडीने उपाययोजनेचेही आदेश महापौरांनी दिले. याप्रसंगी कार्यकारी अभियंता उदय धर्माधिकारी यांनी पंचवटी विभागात बव्हंशी ठिकाणी जुन्या पाइपलाइन असल्याने त्या बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानुसार, महापौरांनी सदर पाइपलाइन बदलण्याचे निर्देश देतानाच त्याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना कल्या. याशिवाय, पंचवटीतील जलशुद्धीकरण केंद्राची क्षमता वाढविण्याबरोबरच तेथील गळती शोधून ती थांबविण्याचेही आदेशित केले. बैठकीला नगरसेवक विमल पाटील, हेमंत शेट्टी, प्रा. सरिता सोनवणे, भिकूबाई बागुल, कमलेश बोडके, पूनम धनगर, पूनम सोनवणे, सुनीता पिंगळे, प्रियंका माने, पुंडलिक खोडे, जगदीश पाटील आदीसह पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चव्हाणके, धर्माधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)