शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

जागेच्या प्रतीक्षेत परिवहन महामंडळ

By admin | Updated: July 19, 2014 01:05 IST

जागेच्या प्रतीक्षेत परिवहन महामंडळ

नाशिक : सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर बाहेरून येणाऱ्या भाविकांना शहरात आणणाऱ्या बसेससाठी शहराबाहेर उभारण्यात येणार असलेल्या थांब्यांसाठी प्रशासनाने परिवहन महामंडळाला अद्याप जागाच दिल्या नसल्याने हे थांबे उभारायचे कोठे, असा प्रश्न परिवहन विभागाला पडला आहे.
सिंहस्थासाठी लाखो भाविक नाशिकमध्ये दाखल होत असतात. पर्वणी काळात शहरात खासगी वाहनांना प्रवेश नसल्याने त्या भाविकांना बाहेरून शहरात आणण्याचे काम महामंडळाच्या बसेसद्वारे केले जाते. त्यासाठी शहराबाहेर प्रत्येक महत्त्वाच्या ठिकाणी बसथांबा उभारला जातो. शहराला जोडणाऱ्या किमान दहा महत्त्वाच्या मध्यवर्ती ठिकाणी हे थांबे उभारले जातात. त्यासाठी प्रशासनाकडून ठरावीक जागा काही कालावधीच्या आत महामंडळाला सुपूर्द केल्या जातात. त्यानंतर महामंडळ त्या जागी दुरुस्ती करून तेथे शेड उभारते आणि प्रवाशांच्या तसेच कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी बांधकामही करते. त्यासाठी जागा मिळाल्यानंतर किमान काही महिने काम चालते.
परंतु यंदा सिंहस्थाला केवळ एक वर्षाचाच अवधी बाकी असताना, त्याबाबत प्रशासनाकडून अद्याप कोणतेही पाऊल उचलले जात नसल्याने महामंडळासमोरील अडचणी वाढल्या आहेत. मर्यादित वेळेत जर जागा दिल्या तर त्यावर होणाऱ्या कामासाठी पुरेसा वेळ मिळणार नाही आणि त्याचा फटका प्रवाशांच्या वाहतुकीला बसेल. त्यामुळे अशा जागा निश्चित करून त्या त्वरित महामंडळाला सुपूर्द कराव्यात, अशी मागणी परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी केली आहे. (प्रतिनिधी)