वाडीपिसोळलाखंडेराव महाराज यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 17:45 IST2019-01-25T17:44:42+5:302019-01-25T17:45:02+5:30

जायखेडा: वाडीपिसोळ ता. बागलाण येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने जागर गोंधळाबरोबरच विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते.

Wadi Pisollagandhara Rao Maharaj Yatra | वाडीपिसोळलाखंडेराव महाराज यात्रा

वाडीपिसोळलाखंडेराव महाराज यात्रा

जायखेडा: वाडीपिसोळ ता. बागलाण येथील ग्रामदैवत खंडेराव महाराज यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या निमित्ताने जागर गोंधळाबरोबरच विविध धार्मिक कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. जायखेडा, वाडीपिसोळ, जयपूर,एकलहरे, नांदीनसह पंचक्र ोशीतील शेकडो भाविकांनी खंडेराव महाराजांच्या मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रौत्सवाच्या सुरु वातीला बारा बैलगाडीतून मांडव मिरवणूक काढून करण्यात आली यावेळी आयोजित पूजा विधीसाठी सरपंच चंद्रसिंग सूर्यवंशी,जायखेडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश गुरव, उपसरपंच वसंतअ हिरे, दगा सोनवणे, पोलीस पाटील योगेश खैरनार, किरण पाटील, ग्रा.प. सदस्य हिरितसंग खैरनार,डॉ. नवलसिंग खैरनार, राजू सोनवणे, शामराव माळी, अशोक मोहिते, सुरेश खैरनार,धनराज माळी, काशिनाथ ठाकरे, आदीं उपस्थित होते. ग्रामस्थांच्या मनोरंजनासाठी नथ्थूभाऊ सोनवणे भोकरकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हजारो रशिक प्रेक्षक उपस्थित होते.

Web Title: Wadi Pisollagandhara Rao Maharaj Yatra