शहरं
Join us  
Trending Stories
1
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
2
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
3
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
4
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
5
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
6
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
7
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
8
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
9
'पक्षात एवढा अपमान होत असेल तर मी काँग्रेस सोडेल!', नितीन राऊत यांचा इशारा, विकास ठाकरे यांची प्रदेशाध्यक्षांकडे तक्रार
10
वेळेविरुद्धची शर्यत! ५ मिनिटांचा उशीर अन् जाहीर माफी; महिला मंत्र्याचा 'तो' Video तुफान व्हायरल
11
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
12
'या' दोन शब्दांची जादू अनुभवून तर पाहा; मनातले सगळे नकारात्मक विचार क्षणात पळून जातील
13
काव्या मारनच्या SRH ला धक्का; पॅट कमिन्स परतणार अशी चर्चा रंगत असताना 'या' खेळाडूनं सोडली साथ
14
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
15
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
16
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
17
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
18
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
19
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
20
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मनसेचा कृती आराखड्याचा ‘उतारा’

By admin | Updated: September 26, 2015 23:21 IST

बैठक : राज ठाकरे यांचे संकेत

नाशिक : राज्यातील दुष्काळ आणि टंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भेडसावणारे प्रश्न आणि समस्या यासंदर्भात एकत्रित कृती आराखडा तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतला आहे. या कृती आराखड्यानुसार सरकारने त्वरित कार्यवाही न केल्यास मनसेच्या वतीने राज्यभर आंदोलन उभारण्यात येणार आहे.नाशिक येथील मनसेच्या राजगड या कार्यालयात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांची व ग्रामीण भागातील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या समस्या व प्रश्न नेमके काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. शेतकऱ्यांच्या मालाला हमी भाव दिला पाहिजे, पश्चिम वाहिनी नद्यांना पूर्व वाहिनी नद्यांना जोडण्यात यावे, स्वामिनाथन आयोगानुसार शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादन खर्चावर आधारित ५० टक्केनफा देण्यात यावा, शेतकऱ्यांना सद्यस्थितीत बाजार भावानुसार कर्ज मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीचे बाजार भावाच्या मूल्यांकनानुसार ३० ते ४० टक्केकर्ज मिळावे, ते तूर्तास अत्यल्प प्रमाणात मिळते, दुष्काळ निवारण्यासाठी सरकारने एका समितीचे गठण करावे, यासह विविध मागण्यांचा उहापोह या बैठकीत झाल्याचे समजते. शेतकऱ्यांचे नेमके प्रश्न काय आहेत? त्यांची उत्तरे शोधू व त्यानंतरच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर जन आंदोलन उभारू, अशी ग्वाही राज ठाकरे यांनी बैठकीत दिल्याचे समजते. यावेळी बैठकीत ग्रामीण जिल्हाध्यक्ष जि. प. सदस्य संदीप पाटील, अ‍ॅड. रतनकुमार इचम, शांताराम जाधव, शेखर पवार यांनी प्रश्न मांडल्याचे कळते. बैठकीस अविनाश अभ्यंकर, महापौर अशोक मुर्तडक, शहराध्यक्ष नगरसेवक राहुल ढिकले, जिल्हाध्यक्ष सुदाम कोंबडे, शशिकांत जाधव, गटनेते अनिल मटाले, सलीम शेख, रमेश खांडबहाले, शरद शिंदे, मनोज ढिकले, दीपक पगार, हंसराज वडघुले, अतुल अहिरे, जगदीश अहिरे, डॉ. राजेंद्र शिरोडे, संदीप रौंदळ, राजेंद्र माळी, धोंडीराम बोरसे, मनोज सोनवणे, राकेश भामरे, कुंदन पाटील, अरुण दुगजे, जगन्नाथ गायकवाड, बबन जहागीरदार आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)