शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
3
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
4
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
5
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
6
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
7
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
8
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
9
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
10
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
11
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
12
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
13
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
14
Latest Marathi News LIVE Updates: देशातील महिला बघताहेत, त्यांच्या रस्त्यातील अडथळा कोण आहेत? अमित शाहांचा घणाघात
15
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
16
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
17
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
18
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
19
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
20
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
Daily Top 2Weekly Top 5

गाव-खेड्यात पोहोचल्या मतदान चिठ्ठ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 01:46 IST

मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गावागावांतील मतदारांपर्यंत निवडणूक शाखेनेच मतदान स्लिपा वाटपाची मोहीम सुरू केली आहे. गावखेड्यातील तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्यात मतदानाविषयीची जागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भातील मोहीम अधिक पारपदर्शक आणि गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ठळक मुद्देनिवडणूक शाखेचा उपक्रम; गावागावांत माहिती पुस्तिकांचे वाटपनवमतदारांना मतदान करण्याचे आवाहन; आदिवासी भागातील मतदारांना केंद्रापर्यंत आणणार

नाशिक : मतदानापासून कुणीही वंचित राहू नये यासाठी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार गावागावांतील मतदारांपर्यंत निवडणूक शाखेनेच मतदान स्लिपा वाटपाची मोहीम सुरू केली आहे. गावखेड्यातील तसेच दुर्गम भागातील मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्यात मतदानाविषयीची जागृती करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सूरज मांढरे यांनी यासंदर्भातील मोहीम अधिक पारपदर्शक आणि गतिमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत.मतदानाच्या आदल्या दिवशी किंवा मतदानाच्या दिवशी राजकीय पक्षांकडून मतदारांना मतदान स्लिपांचे वाटप केले जाते. परंतु प्रत्येक मतदारालाच अशाप्रकारची सुविधा मिळते असे नाही. त्यामुळे गाव-खेडे तसेच अतिदुर्गम भागातील मतदारांनादेखील मतदान केंद्रापर्यंत आणण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेच्या वतीने मतदान स्लिपांचे वाटप करण्यात येत आहे. सदर मोहिमेला सुरुवात झाली असून, मतदारांमध्ये जनजागृती करण्याबरोबरच त्यांना मतदानाची माहिती दिली जात आहे. जुन्या मतदारांसह नवमतदारांनादेखील मतदान करण्याबाबतचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.या मोहिमेत मतदान स्लिपांबरोबरच मतदारांसाठी माहिती पुस्तिकादेखील दिली जात आहे. या पुस्तिकेमध्ये मतदारांना मतदान नोंदणीपासून ते मतदान करण्याच्या प्रक्रियेपर्यंत माहिती देण्यात आलेली आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यांचीदेखील माहिती छापील स्वरूपात देण्यात आलेली आहे. मतदान केंद्रामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधांची माहितीदेखील या पुस्तिकेतून देण्यात आली आहे. जास्तीत जास्त मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी निवडणूक शाखेकडून व्यापक प्रयत्न करण्यात आलेले आहे.निवडणूक शाखेकडून राबविण्यात येत असलेल्या या मोहिमेतून ग्रामीण आणि आदिवासी भागातील मतदारांमध्ये जनजागृती करण्याचा मुख्य उद्देशदेखील आहे. आदिवासी भागातील मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणण्याची व्यवस्थादेखील केली जाणार असून, त्याबाबतची माहितीदेखील मतदारांना दिली जात आहे. मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली असल्याने कुणीही कामावर जाऊ नये याबाबतची आठवणही करून दिली जात आहे. ग्रामीण भागात मतदानाची सर्व माहिती पुरविण्याच्या हेतूने आयोगाकडून मोहीम राबविली जात आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय