शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
2
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
3
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
6
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
7
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
8
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
9
IPL 2026: हार्दिक - बुमराहमध्ये Live सामन्यातच बाचाबाची? सोशल मीडियावर Videoमुळे चर्चांना उधाण
10
सिंधुदुर्गात 7 कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी पकडली; शिरोडा येथे वनविभागाकडून कारवाई: चौघेजण ताब्यात 
11
"आमची मुलं दोषी असतील तर फाशी द्या"; TCS धर्मांतर प्रकरणावर आरोपींच्या पालकांचा संताप
12
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
13
Shocking: मृत्युनंतर माणसाचं काय होतं? मृत्युच्या १३ मिनिटांनी पुन्हा जिवंत झालेली महिला म्हणाली...
14
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
15
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
16
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
17
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
18
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
19
राेज ६ मिनिटं वाचन केलं तर मानसिक तणाव होतो कमी, वाचनाची सुटलेली सवय लावायची सोपी युक्ती
20
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाची वेळ संपल्यानंतरही मतदारांची गर्दी

By admin | Updated: February 22, 2017 01:12 IST

उत्तमनगर परिसरातील प्रकार, मतदार कुलूपबंद

नाशिक : नाशिक महानगरपालिकेसाठी मंगळवारी  (दि. २१) शहरात मतदान घेण्यात आले. सिडको, कामटवाडे तसेच अंबड परिसरात मतदानाची नियोजित वेळ संपल्यानंतरही मतदारांनी मतदान करण्यासाठी केंद्राबाहेर रांगा लावल्याचे चित्र बघायला मिळाले. दुपारी उन्हाची तीव्रता जास्त असल्याने अनेक मतदार साडेचारनंतर मतदानासाठी बाहेर पडले. सिडको येथील मविप्र संचलित केएसकेडब्ल्यू महाविद्यालय, मोरवाडी येथील उत्कर्ष मित्रमंडळ, विखे पाटील शाळा, राणाप्रताप चौक येथील विवेकानंद विद्यालय, कामटवाडे येथील मीनाताई ठाकरे विद्यालय, त्रिमूर्ती चौक येथील पेठे विद्यालय आदि ठिकाणी दुपारी मोठ्या प्रमाणात मतदारांनी मदानासाठी गर्दी केली होती. उत्तमनगर येथील केएसकेडब्ल्यू महाविद्यालयात मंगळवारी साडेपाच वाजता महाविद्यालयाचा मुख्य दरवाजा बंद करून मतदानासाठी आलेल्या नागरिकांना आत सोडण्यात आले. एकाच वेळी मतदारांची एवढ्या प्रमाणात गर्दी झाल्याने मतदान केंद्र्रावरील कर्मचाऱ्यांची धांदल उडाली. महाविद्यालयाच्या दर्शनी भागात मतदार एकाच ठिकाणी गोळा झाल्याने उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना गर्दीचे नियोजन करताना अडचणींचा सामना क रावा लागला. मतदान केंद्रात येण्याजाण्यासाठी एकच दरवाजा असल्याने येथील सुरक्षायंत्रणेवरदेखील मोठ्याप्रमाणात ताण पडत होता. (प्रतिनिधी)उत्तमनगर येथील महाविद्यालयात संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर महाविद्यालयाच्या मुख्यालयात झालेली मतदारांची गर्दी.