शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
3
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
4
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
5
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
6
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
7
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
8
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
9
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
10
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
11
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
12
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
13
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
14
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
15
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
16
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
17
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
18
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
19
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
20
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
Daily Top 2Weekly Top 5

अनुसूचित जमाती समितीचा दौरा

By admin | Updated: September 29, 2016 00:35 IST

निवेदनांचा वर्षाव : जिल्हा परिषद, कोळी महादेव संघटनेचे साकडे

नाशिक : जिल्हा दौऱ्यावर आलेल्या राज्याच्या विधान मंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीची भेट घेऊन जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांसह आदिवासी कोळी महादेव संघटनेने विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. जिल्हा समिती दौऱ्यावर आलेल्या समितीच्या पदाधिकाऱ्यांना भेटून अनेकांनी आपली भूमिका मांडली. शासनाकडे करण्यात आलेला पत्रव्यवहार, दिलेली निवेदने, मिळालेली आश्वासने याबाबत झालेल्या दिरंगाई बाबत समितीकडे अनेक सदस्यांनी लेखी स्वरूपात तक्रारी मांडल्या.१ जिल्हा परिषद अध्यक्ष विजयश्री चुंभळे यांनी समितीचे अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांना २७०२ लेखाशीर्षचा निधी वळविल्याबाबत निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या सन २०१६-१७ आदिवासी व बिगर आदिवासी योजना लेखाशीर्ष २७०२ अंतर्गत मंजूर निधी जिल्हाधिकारी कार्यालयाने परस्पर जलयुक्त शिवार अभियानासाठी वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेला पत्र पाठविले आहे. जिल्हा परिषदेच्या २४ सप्टेंबरच्या सर्वसाधारण सभेत जिल्हाधिकारी यांनी पाठविलेल्या पत्राचे वाचन करण्यात आल्यानंतर सभागृहातील सदस्य संतप्त झाले. हे पत्र निर्गमित करून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या हक्कावर अतिक्रमण केल्याची भावना सदस्यांची झाली आहे. वास्तविक पाहता जिल्हा परिषदेस निधी मंजुरी ही जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी परस्पर अशा प्रकारे निधी वळविणे चुकीचे आहे. त्यामुळे या प्रकारामुळे जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी काढलेले पत्र तत्काळ रद्द करण्यात यावे, असे निवेदनात म्हटले आहे. समाज कल्याण समिती सभापती उषा बच्छाव यांनी समिती अध्यक्ष आमदार रूपेश म्हात्रे यांना निवेदन दिले. जिल्ह्यातील देवळा, मालेगाव, कळवण व बागलाण या तालुक्यात ६० ते ७० हजार लोकसंख्या असलेला महादेव कोळी समाज आहे. या तालुक्यातील संबंधित समाजाच्या जात दाखल्यांना जात वैधता प्रमाणपत्र तत्काळ मिळावे, जात पडताळणीच्या जाचक अटी रद्द करण्यात याव्यात, ७० टक्के आदिवासी लोकसंख्या असलेल्या गावांचा आदिवासी क्षेत्रात समावेश करावा, १५ जून १९९५ च्या निर्णयानुसार आदिवासी कर्मचाऱ्यांना सेवेत देण्यात आलेल्या संरक्षणाची व्याप्ती वाढवावी आदि मागण्यांचा निवेदनात समावेश आहे. यावेळी सभापती शोभा डोखळे, सदस्य गोरख बोडके, प्रा. अशोक जाधव आदि उपस्थित होते.३ आदिवासी कोळी महादेव समाज संघटनेच्या वतीने अनुसूचित जमाती कल्याण समितीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना सकस आहार व दर्जेदार भोजन मिळत नाही. अशी तक्रार करण्यात आली. भोजनाचा ठेकेदार विद्यार्थ्यांना अरेरावी करतो. त्याबाबत कार्यवाही व्हावी. यावेळी संघटनेचे पृथ्वीराज अंडे, प्रवीण कडाळे, देवीदास वाटाणे, दीपक श्रीखंडे, धनराज चेहेरे, रोशन गांगुर्डे, सुमीत कौले आदि उपस्थित होते.