व्हीआयपी दर्शन बंद; ‘चिंतामणी’च्या दरबारी सगळे सारखेच !

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2024 06:47 AM2024-02-07T06:47:43+5:302024-02-07T06:48:05+5:30

व्हीआयपी दर्शन बंद; नाशिकच्या भाविकाच्या प्रयत्नांना आले यश

VIP viewing closed; All the courtiers of 'Chintamani' are the same! | व्हीआयपी दर्शन बंद; ‘चिंतामणी’च्या दरबारी सगळे सारखेच !

व्हीआयपी दर्शन बंद; ‘चिंतामणी’च्या दरबारी सगळे सारखेच !

लोकमत न्यूज नेटवर्क 
नाशिक : अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (जि. पुणे) येथील चिंतामणी मंदिरातील १०० रुपये भरून व्हीआयपी दर्शन घेण्याची सुविधा बंद करण्याचा निर्णय चिंतामणी ट्रस्टने घेतला आहे. 

नाशिकमधील एक भाविक कैलास दळवी यांनी व्हीआयपी दर्शनाबाबत कायदेशीर नोटीस बजावली होती. त्यानंतर ट्रस्टने तातडीची बैठक घेतली आणि व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला. चिंतामणी ट्रस्टचे वकील मनोज वाडेकर यांनी यासंदर्भात दळवी यांचे वकील मनोज पिंगळे यांना पत्र दिले आहे.

राज्यात त्र्यंबकेश्वर, वणी, शिर्डीपासून अनेक ठिकाणी सशुल्क दर्शन दिले जाते. राज्यघटनेच्या समतेच्या तत्त्वाच्या विरोधात ही कृती आहे. त्यामुळे या देवस्थानांनी देखील सशुल्क दर्शनाबाबत फेरविचार करावा. 
- कैलास दळवी, भाविक

सशुल्क दर्शन हे राज्यघटनेशी विसंगत
nनाशिकमधील निर्भय फाऊंडेशनचे सदस्य माजी सरपंच कैलास दळवी हे गेल्या १ जानेवारीला नवीन वर्षाच्या निमित्ताने अष्टविनायक दर्शनासाठी गेले.
nमंदिरात शंभर रुपयांत सशुल्क दर्शन म्हणजेच व्हीआयपी दर्शनाचा फलक त्यांनी बघितला. दळवी यांनी त्यास आक्षेप घेतला. त्यांनी ॲड. मनोज पिंगळे यांच्यामार्फत चिंचवड देवस्थानास नोटीस बजावली. पैशाच्या आधारे भेदभाव करणे हे राज्यघटनेशी विसंगत असल्याचे नोटिसीत म्हटले होते.

Web Title: VIP viewing closed; All the courtiers of 'Chintamani' are the same!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.