शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
3
गेम ओव्हर! नगरसेवकपद धोक्यात असलेल्या सहर शेख ‘वानखेडे’वर; इन्स्टा स्टोरीतून कुणाला डिवचले?
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
टिकली किंवा गंध लावण्यावर बंदी, पण हिजाबला परवानगी? लेन्सकार्टच्या ड्रेस कोड वादावर पियुष बन्सल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले...
6
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
7
१४ वर्षीय मुलीची हत्या? प्रसिद्ध गायकाला पोलिसांनी केली अटक, मनोरंंजन विश्वात खळबळ
8
मुलींचे अश्लील व्हिडीओ काढणाऱ्या अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
9
Nida Khan : "आमची मुलगी प्रेग्‍नेंट, तिला मुद्दाम अडकवलं जातंय"; निदा खानच्या पालकांचा खळबळजनक दावा
10
६ मिनिटं वाचन केल्याने ६८% नी मानसिक तणाव कमी होतो, पण वाचनाची आवड लावायची कशी?
11
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दहशत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
12
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
13
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
14
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
15
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
16
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
17
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
18
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
19
कोण आहे सीताराम बाबा? ज्यांनी भाजपा आमदाराला जोरजोरात ठोसे मारले अन् ढकलून दिलं, Video व्हायरल
20
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील विनय फडणीस यांच्या पोलीस कोठडीत वाढ

By admin | Updated: April 30, 2017 01:44 IST

नाशिक : व्याजाचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विनय फडणीस यांच्याविरोधात तक्रारींचा ओघ वाढत आहे़

नाशिक : गुंतवणूकदारांना बँकेपेक्षा अधिक व्याजाचे आमीष दाखवून कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक घेत फसवणूक केल्याप्रकरणी एमपीआयडी कायद्यान्वये गुन्हा दाखल असलेले पुण्यातील नामांकित फडणीस ग्रुप अ‍ॅण्ड कंपनीज् व फडणीस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक विनय प्रभाकर फडणीस यांच्याविरोधात दिवसेंदिवस तक्रारींचा ओघ वाढत चालला असून, आतापर्यंत १०४ गुंतवणूकदारांनी तक्रारी नोंदविल्या आहेत़ दरम्यान, संचालक फडणीस यांची कोठडीची मुदत संपल्याने शनिवारी (दि़२९) जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांच्या न्यायालयात हजर केले असता २ मेपर्यंत कोठडीत वाढ करण्यात आली आहे़नाशिक शहरातील मुंबईनाका, इंदिरानगर, सरकारवाडा या पोलीस ठाण्यांमध्ये फसवणूक व एमपीआयडी कायद्यान्वये पाच गुन्हे दाखल आहेत़ आर्थिक गुन्हे शाखेने १९ एप्रिल रोजी मुंबईतील विक्रोळी येथून फडणीस यांना अटक केली होती़ त्यांना न्यायालयाने २९ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. या पोलीस कोठडीतील तपासात फडणीस यांच्या नावे दहाहून अधिक कंपन्या असल्याचे उघडकीस आले असून, त्यामधील दहा-बारा व्यक्तीच सर्व कंपन्यामध्ये संचालक आहेत़ तसेच या कंपनीच्या १७ एजंटही तपासात समोर आले आहे़ जिल्हा सरकारी वकील अजय मिसर यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना सांगितले की, या कंपनीने राज्यभरातील अनेक गुंतवणूकदारांना गंडा घातला असल्याने फडणीस ग्रुपचे आर्थिक व्यवहार तपासणे, एजंटमार्फत करण्यात आलेली गुंतवणुकीची माहिती घेणे, कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आलेल्या कॉम्प्युटरच्या क्लोनिंग करून माहिती संकलित करणे, संचालक अनुराधा विनय फडणीस, शरयू विनायक ठकार, भाग्यश्री गुरव, सायली फडणीस यांच्याकडेही तपास करणे यासाठी पोलीस कोठडीची मागणी केली़ त्यानुसार २ मेपर्यंत पोलीस कोठडीत वाढविण्यात आली आहे़ (प्रतिनिधी)