शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

कृषी सहायकाला ग्रामस्थांनी बांधले

By admin | Updated: March 2, 2016 23:30 IST

अवकाळी पाऊस : ३०० एकर पिकांचे नुकसान

नाशिक : गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे जिल्ह्यातील गहू, द्राक्ष आणि टमाटा या पिकांना मोठा फटका बसला असून, लोकप्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. इगतपुरी तालुक्यातील खेड जिल्हा परिषद गटात सुमारे ४०० ते ५०० एकरवरील टमाटा, कांदा, गहू व फ्लॉवरला फटका बसला आहे. तर नाशिक तालुक्यातील सिद्धप्रिंपी गावात एका शेतकऱ्याची संपूर्ण द्राक्षबाग कोेलमडून पडल्याने सात लाखांचे नुकसान झाल्याची माहिती उपसभापती अनिल ढिकले यांनी दिली.बुधवारी (दि. २) सकाळीच आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हा परिषद सदस्य सुजाता सुनील वाजे, प्रांत बाळासाहेब वाकचौरे, तहसीलदार महेंद्र पवार, पंचायत समिती सदस्य पांडुरंग वारुंगसे, हरिदास लोहकरे, तालुका कृषी अधिकारी शेवाळे यांनी इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव, वासाळी, इंदोरे, खडकेद, बारशिंगवे, सोनोशी, मायदरा, टाकेद यांसह १५ ते २० गावात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांनी एकरी एक लाख रुपये कर्ज काढून लावलेल्या टमाटा, कांदा, फ्लॉवर, गहू या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची कैफियत आमदार राजाभाऊ वाजे यांच्यासमोर मांडली. यावेळी आमदार राजाभाऊ वाजे यांनी नुकसानग्रस्त शेतपिकांचे व शेतमालाचे तत्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदतीसाठी नुकसान भरपाईचे प्रस्ताव शासनाकडे पाठवावेत, असे आदेश यंत्रणेला दिले. एकट्या खेड जिल्हा परिषद गटात ३०० एकरवरील टमाटा तसेच गहू व फ्लॉवरचे नुकसान झाले आहे. खेड गावात एक ते दीड कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.त्याचप्रमाणे नाशिक तालुक्यातील सिद्ध्रपिंप्री येथे गारपीट व वादळी वाऱ्यामुळे गावातील द्राक्षबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त द्राक्षबागांची पाहणी पंचायत समितीचे उपसभापती अनिल ढिकले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. गावातील गणेश राजोळे या शेतकऱ्याची संपूर्ण द्राक्षबाग वादळी वाऱ्यामुळे कोलमडून पडल्याने सहा ते सात लाखांचे नुकसान झाल्याचे अनिल ढिकले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)