विलास पाटील : कामे वेळेत होतील

By Admin | Updated: January 1, 2015 00:24 IST2015-01-01T00:24:01+5:302015-01-01T00:24:12+5:30

त्र्यंबकेश्वर येथे सिंहस्थ आढावा बैठक

Vilas Patil: The works will be in time | विलास पाटील : कामे वेळेत होतील

विलास पाटील : कामे वेळेत होतील

त्र्यंबकेश्वर : येथील सिंहस्थसंबंधित सर्वच विकासकामे वेळेत आणि चांगल्या दर्जाची होतील यात शंका नाही, असा निर्वाळा जिल्हाधिकाऱ्यांनी बुधवारी येथे आयोजित केलेल्या आढावा बैठकीप्रसंगी दिला. सिंहस्थ कामांसंबंधित सर्व अधिकाऱ्यांसह साधू-महंत उपस्थित होते. यात अधिकाऱ्यांसह साधू-महंतांनी विविध सूचना मांडल्या.
सिंहस्थ कुंभमेळा अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपला आहे. सध्या त्र्यंबकमध्ये रस्ते, जलवाहिन्यांची कामे, भूमिगत वीजवाहिनी, कुशावर्त तीर्थासह वाढीव पाणीपुरवठा योजना-फिल्टर प्लॅन्ट्स, घाटबांधणी आदि अनेक कामांची मुदत मार्च एण्ड ठरवून दिली होती.
तथापि आजच्या बैठकीत बहुतेक कामे वेळेपूर्वीच पूर्ण होतील व सार्वजनिक बांधकाम विभाग करीत असलेली कामे मार्चअखेर किंवा एप्रिलअखेर पूर्ण करू असे सांगितले.
बैठकीसाठी जिल्हाधिकारी विलास पाटील, उपजिल्हाधिकारी तथा मेळाधिकारी उदय किसवे, नगराध्यक्ष अलका शिरसाट, उपनगराध्यक्ष ललित लोहगावकर, मुख्याधिकारी एन.एम. नागरे, पालिका अभियंता प्रशांत जुन्नरे, रमेश कांगणे, नगरसेवक रवि सोनवणे, धनंजय तुंगार, रवींद्र गमे, सिंधू मधे, बांधकाम सभापती तृप्ती धारणे, माधुरी जोशी, अभिजित काण्णव, संतोष कदम तसेच उपविभागीय अभियंता दिलीप भदाणे, महेश पाटील, मनोज पाटील, निकम, सायनेकर, उपअभियंता धनाईत, मंगेश प्रजापती, सहाणे तसेच महंत हरिगिरी, महंत शंकरानंद, स्वामी सागरानंद सरस्वती, महंत पिनाकेश्वर, महंत प्रेमानंदजी, महंत रवींद्रपुरी, महंत राजेंद्रसिंंह, महंत दुर्गानंद, महंत विचारदास आदि साधू-महंत आदि उपस्थित होते. (वार्ताहर)

Web Title: Vilas Patil: The works will be in time