शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश संतापले; दिला मोठा इशारा!
2
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
3
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
4
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
5
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
6
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
7
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
8
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
9
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
10
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
11
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
12
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
13
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
14
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
15
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
16
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
17
Chris Gayle: "माझ्यावर प्रचंड कर्ज, माझ्यासाठी IPL खेळणं गरजेचं" ऑक्शननंतर ख्रिस गेलनं कुणाला केला फोन?
18
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
19
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
20
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
Daily Top 2Weekly Top 5

वडाळीभोईला शिवायण संगीत चरित्र

By admin | Updated: November 14, 2016 00:08 IST

वडाळीभोईला शिवायण संगीत चरित्र

चांदवड : वडाळीभोई येथील विनता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सव सांगता समारोपानिमित्त दि. १४ ते २० नोव्हेंबरदरम्यान येथील सोसायटी मैदानावर दररोज सायंकाळी ६.३० ते ९.३० वाजेपर्यंत शिवशाहीर विजय तनपुरे यांचे शिवायण या छत्रपती शिवाजी महाराज संगीत चरित्र कथामालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष नितीन अहेर, उपाध्यक्ष शिवाजी जाधव, मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप अहेर यांनी दिली. या कथामालेत सोमवारी (दि. १४) शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र व किल्ले शिवनेरी, शिवजन्म, दि. १५ रोजी बालपण दि. १६- दादाजी कोंडदेव यांचा मृत्यू, पुरंदर विजय, विवाह सोहळा, जावळी काबीज, कल्याणच्या खजिन्याची लूट, दि. १७- प्रतापगडचा रणसंग्राम- अशी लढली पावनखिंड व बाजीप्रभू शौर्यगाथा, दि. १८- शाहिस्तेखानाची बोटे तोडली व पुरंदरचा तह, दि. १९- आग्य्राहून सुटका व गड आला पण सिंह गेला तसेच प्रतापराव गुजर शौर्यगाथा, दि. २०- शिवराज्याभिषेक असे कार्यक्रम होणार आहेत. रसिक श्रोत्यांना भुरळ पाडणारा ऐतिहासिक घटना पोवाड्याच्या माध्यमातून सादर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना याचा विशेष फायदा होणार असून, विनता पतसंस्थेच्या कार्यक्रमाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. (वार्ताहर)