शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
2
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
3
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
4
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
5
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
6
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
7
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
8
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
9
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
10
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
11
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
12
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
13
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
14
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
15
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
16
खारेगाव टोलनाक्यावर भीषण अपघात; ट्रकच्या धडकेत भांडुपमधील दाम्पत्याचा जागीच मृत्यू
17
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
18
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
19
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
20
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पेठला जपानी शेतीचा प्रयोग

By admin | Updated: October 22, 2016 00:17 IST

तंत्रज्ञांची भेट : मातीच्या प्रकारासह जलसिंचन व्यवस्थेची पाहणी

रामदास शिंदे पेठसुरगाणा, पेठ तालुक्यातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आता आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच जपानी तंत्राचा वापर करून शेती करण्याचा प्रयोग करण्यात येणार असून, गावंधपाडा येथे जपानी शेतीतज्ज्ञानी भेट देऊन शेती, मातीचा प्रकार व जलसिंचन व्यवस्थेची पाहणी केली.पेठ, सुरगाणा तालुक्यात मुख्यत्वे भात, नागलीची पिके घेतली जातात. मात्र उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक होत असल्याने शेतकऱ्यांचा आर्थिक विकासदर वाढत नाही. अखेर शेतीला रामराम ठोकून येथील शेतकरी देशावर रोजगाराच्या शोधात भटकंती करताना दिसून येतो. सुपीक जमीन व मुबलक पाणी असूनही केवळ तंत्रज्ञानाची माहिती नसल्याने शेतकरी उत्पन्नवाढीपासून वंचित राहत असल्याचे पाहून गावंधपाडा येथील सेंद्रिय शेतीतज्ज्ञ यशवंत महादू गावंढे यांनी स्वत:च्या शेतीत नवनवीन प्रयोग राबवून शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची संधी उपलब्ध करून दिली. विविध नगदी पिकांवर सेंद्रिय प्रयोग करून त्यांनी उत्पन वाढीचे मार्ग शोधले. यासाठी त्यांनी जिल्ह्यातील पहिला पुरुष सेंद्रिय शेती बचतगट स्थापन केला.  गावंढे यांच्या कृषी  कार्याची दखल घेऊन जपानचे शेतीतज्ज्ञ सुगु काजी कावा व गोहितो यांनी गावंधपाडा येथे भेट देऊन शेतजमिनीची पाहणी केली. जपानी पद्धतीने भाजीपाला व फळझाडांची लागवड करून त्याचे तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच अशा प्रकारची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादनासह बाजारपेठही उपलब्ध करून दिली जाणार असल्याने आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळणार आहे. गावंधपाडा येथे अशा प्रकारची जपानी शेतीचा नमुना व प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.