शहरं
Join us  
Trending Stories
1
हातोडावाले तात्या रोड रोलर घेऊन पुण्यात फिरणार; वसंत मोरेंचे निवडणूक चिन्ह जाहीर
2
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
3
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
4
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
5
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
6
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
7
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
8
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
9
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
10
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
11
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
12
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
13
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
14
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
15
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
16
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
17
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
18
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
19
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
20
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली

मानोरीत अज्ञाताने शेतातून कांदे फेकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 12:57 AM

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी विठ्ठल चंद्रभान तिपायले यांच्या शेतात नव्याने लागवड केलेल्या सव्वा एकर उन्हाळी कांद्याच्या लागवडीतून अज्ञान व्यक्तीने कांद्याचे दोन वाफे उपटून रस्त्यावर फेकल्याची घटना घडली आहे.

ठळक मुद्देफटका : शेतकऱ्याचे हजारोंचे नुकसान

मानोरी : येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुक येथील शेतकरी विठ्ठल चंद्रभान तिपायले यांच्या शेतात नव्याने लागवड केलेल्या सव्वा एकर उन्हाळी कांद्याच्या लागवडीतून अज्ञान व्यक्तीने कांद्याचे दोन वाफे उपटून रस्त्यावर फेकल्याची घटना घडली आहे.शेतकरी विठ्ठल तिपायले रविवारी घरगुती विवाह सोहळ्यासाठी गेले होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर सोमवारी सकाळी कांद्यासाठी पाणी भरायचे असल्याने खाद टाकत असल्याने दोन वाफ्यांमध्ये कांदेच दिसत नसल्याने तिपायले यांच्या चिंतेत भर पडली. तिपायले यांनी तत्काळ परिसरातील शेतकऱ्यांशी याबाबत विचारणा करत आमच्या शेतात कोणाला कांदे उपटताना बघितले का ? अशी विचारणा केली. मात्र, हा प्रकार कोणाच्याही लक्षात न आल्याने तिपायले यांना यातून मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.महागड्या औषधांची फवारणीयंदा कांदा लागवडीसाठी रोपे मिळत नसल्याने तिपायले यांनी महागड्या दराने उन्हाळी कांद्याची रोपे विकत घेतली होती. रोपे विकत घेतल्याने मोठ्या मेहनतीने कांदा लागवड केली होती. वातावरणात सातत्याने बदल होऊनही महागडी औषध फवारणी करून तिपायले यांनी कांदा लागवड केली आहे. त्यामुळे मोठ्या मेहनतीने कांदा पीक जगवित असताना कांदे उपटून फेकण्याचा प्रकार संतापजनक आहे.माझ्या शेतात याआधी पाईपलाईन फोडून टाकण्याचे प्रकार घडले आहेत. त्यात हजारो रुपये खर्चून कांदा लागवड करीत असताना त्यात पुन्हा अज्ञात व्यक्तीने कांदे उपटून फेकल्याने मोठे नुकसान झाले आहे.- विठ्ठल तिपायले, कांदा उत्पादक, मानोरी बु.मानोरी बुद्रुक येथील विठ्ठल तिपायले यांच्या शेतातून अज्ञात व्यक्तीने उपटून फेकलेले कांदे. (१५ मानोरी कांदे)

टॅग्स :onionकांदाCrime Newsगुन्हेगारी