नाशिक : गीतकार यशवंत देव यांनी कोटि कोटि रुपे तुझी... या भक्तीगीतातून भगवंताच्या रुपांची सांगितलेला महिमा गणेशोत्सवकाळात गणेशभक्तांना अनुभवयास येत आहे. किती रुपे, किती भाव..., याप्रमाणे शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपासून घरगुती गणेशोत्सव मंडळांपर्यंत बहुतांश नाशिककरांनी ‘इको फ्रेण्डली’ गणेशाची रुपे साकारण्यावर भर दिला आहे. शहर व परिसरातील वैविध्यपूर्ण गणेशाची रुपे लक्षवेधी ठरत आहेत.शहरात विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. धार्मिक-पौराणिक, सामाजिक प्रबोधनपर देखाव्यांसह काही मंडळांनी वैविध्यपूर्ण इको फ्रेण्डली गणपती साकारून आगळावेगळा संदेश दिला आहे. शहरातील वैविध्यपूर्ण गणराय भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
आगळ्यावेगळ्या संकल्पना : नाशिकमध्ये वैविध्यपूर्ण गणरायांचे भाविकांना आकर्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 14:17 IST
धार्मिक-पौराणिक, सामाजिक प्रबोधनपर देखाव्यांसह काही मंडळांनी वैविध्यपूर्ण इको फ्रेण्डली गणपती साकारून आगळावेगळा संदेश दिला आहे. शहरातील वैविध्यपूर्ण गणराय भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
आगळ्यावेगळ्या संकल्पना : नाशिकमध्ये वैविध्यपूर्ण गणरायांचे भाविकांना आकर्षण
ठळक मुद्देई-कचऱ्याच्या माध्यमातून नऊ फुटी बाप्पाची मुर्ती वर्तमानपत्रांच्या माध्यामातून गणपती साकारले. खराट्यांपासून गणरायांचे रुप साकारुन स्वच्छतेचा संदेश देण्याचा प्रयत्न