दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

By Admin | Updated: January 7, 2015 01:20 IST2015-01-07T01:17:47+5:302015-01-07T01:20:37+5:30

दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

The unfortunate death of two wheelers | दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू

नाशिक : भरधाव फॉर्च्युनर कारने दिलेल्या धडकेत कामगारनगर येथील विकास नरेंद्र भट या दुचाकीस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी रात्री सातपूर त्र्यंबकरोडवर घडली़ या प्रकरणी कारचालक डॉ़ अमोल वसंत पाटील (पपया नर्सरीजवळ, सातपूर) यांच्यावर सातपूर पोलीस ठाण्यात मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उज्ज्वल एजन्सीसमोर भरधाव आलेल्या टोयाटो फॉर्च्युनर कारने (एमएच १५ सीएम-८००४) दुचाकीवर जाणारे विकास नरेंद्र भट (४४, कामगारनगर, सातपूर) यांच्या दुचाकीला (एमएच १५ सीजे-९०७०) जोरदार धडक दिली़ यामध्ये भट यांना जबर मार लागल्याने त्यांचा मृत्यू झाला़ या अपघातानंतर कारचालकाने कारसह पळ काढला़ दरम्यान, सातपूर पोलिसांनी फॉर्च्युनर कार जप्त केली असून, फरार डॉ़ अमोल पाटील यांचा शोध सुरू आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: The unfortunate death of two wheelers